कोल्हापूर :
एमएसएलटीए दहा वर्षाखालील मुला-मुलींच्या टेनिस स्पर्धेला शुक्रवारी प्रारंभ झाला. स्पर्धेचे उदघाटन केएसएचे जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांच्या हस्ते झाले. यावेळी केएसएचे कार्यकारणी सदस्य विश्वंभर मालेकर, दीपक घोडके, मुख्य प्रशिक्षक व स्पर्धा प्रमुख मेहुल केनिया, सहाय्यक प्रशिक्षक प्रकाश पाटील उपस्थित होते.
केएसएच्या टेनिस कॉम्प्लेक्स येथे ही स्पर्धा सुरू आहे. एमएसएलटीए दहा वर्षाखालील गटा अंतर्गत मानांकनामध्ये पहिले आठ मुले व मुली (पुणे, सोलापूर, मुंबई, सांगली व सातारा समावेश) यांची निवड या स्पर्धेसाठी झालेली आहे. मानांकित आठ मुलांची दोन गटांतर्गत चार चार याप्रमाणे विभागणी करण्यात आली आहे. याचप्रमाणे मुलींचीही दोन गटांतर्गत चार चार मुलींची विभागणी करण्यात आलेली आहे. या गटांतर्गत स्वतंत्रपणे लीग आणि बाद पद्धतीने सामने होणार आहेत.
एमएसएलटीए दहा वर्षाखालील मुला-मुलींच्या टेनिस स्पर्धेला प्रारंभ
RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
23.8
°
C
23.8
°
23.8
°
42 %
3.6kmh
12 %
Mon
26
°
Tue
26
°
Wed
26
°
Thu
26
°
Fri
26
°

