कोल्हापूर :
नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेड २०२६ साठी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन एनसीसी कॅडेट्सची निवड झाली आहे. या प्रतिष्ठेच्या शिबिरासाठी सीनियर अंडर ऑफिसर हिमेश राठोड व सार्जंट राधिका क्षत्रिय (दोन्ही ड्रिल इव्हेंट) तसेच कॅडेट रिद्धी पद्मुखे (सांस्कृतिक कार्यक्रम) या कॅडेट्सची निवड झाली आहे.
प्रजासत्ताक दिन परेडसाठी देशभरातून निवडक व गुणवंत एनसीसी कॅडेट्सची यासाठी निवड केली जाते. या शिबिराच्या माध्यमातून कॅडेट्समध्ये शिस्त, नेतृत्वगुण, संघभावना, सांस्कृतिक कौशल्ये तसेच राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ केली जाते.
या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, ऋतुराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे तसेच एन.सी.सी. विभागप्रमुख डॉ. आर. डी. महाजन व प्रशिक्षक क्रांतिराज पाटील यांनी कॅडेट्सचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
——————————
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या तीन कॅडेट्सची प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड
RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
22.8
°
C
22.8
°
22.8
°
42 %
3.9kmh
16 %
Sat
25
°
Sun
27
°
Mon
26
°
Tue
26
°
Wed
26
°

