Homeकला - क्रीडाविभागीय शालेय क्रीडा युनिफाईट स्पर्धेत कोल्हापूरला १४ सुवर्णपदके

विभागीय शालेय क्रीडा युनिफाईट स्पर्धेत कोल्हापूरला १४ सुवर्णपदके

कोल्हापूर :
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा युनिफाईट वेलफेअर असोशिएशन सातारा यांच्यावतीने विभागीय शालेय युनिफाईट क्रीडा स्पर्धा कवठे (ता. वाई, जि. सातारा) येथे झाल्या. या स्पर्धेत युनिफाईट असोसिएशन कोल्हापूरने १४ सुवर्णपदके पटकावली.
या स्पर्धा १७, १९ वर्षाखालील वजनगटात मुला-मुलींच्या घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये युनिफाईट असोसिएशन कोल्हापूर जिल्ह्याने नेत्रदीपक कामगिरी करत १४ सुवर्ण, ९ रौप्य व १ कास्यपदक मिळविले.
१७ वर्षाखालील गटात वर्धन सतीश खाडे (मोहनलाल दोशी हायस्कूल, वळीवडे कोल्हापूर), प्रतीक सतीश पाटील (आदर्श विद्यानिकेतन मिणचे कोल्हापूर), अंश सोमनाथ भोसले (मोहनलाल दोशी हायस्कूल वळीवडे), अथर्व भरमणी मिराशी (आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल कोल्हापूर), सुश्वुत राजकुमार साळुंखे (महावीर व रोटे कॉलेज कोल्हापूर), अनन्या राहुल वैद्य (प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर), जान्हवी राहुल गोंजारे (आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल कोल्हापूर) यांनी सुवर्णपदक पटकावले.
केदार तानाजी खांडेकर (मोहनलाल दोशी हायस्कूल वळीवडे), तनिष्का राहुल म्हमूलकर (महावीर व रोटे कॉलेज कोल्हापूर), सारा आशिष कांबळे (आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल) यांनी रौप्यपदक तसेच सारा आशिष कांबळेने कास्य पदक मिळवले.
१९ वर्षाखालील गटात आयुष रंगराव यमकर (राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर), प्रेम संदीप कांबळे (राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज), हर्षवर्धन बाबुराव पाटील (आदर्श विद्यानिकेतन मिणचे  कोल्हापूर), संचित महेंद्र निकम (आदर्श विद्यानिकेतन मिणचे), प्रथमेश शशिकांत बाबर (आदर्श विद्यानिकेतन मिणचे), सिद्धी विक्रम पाटील (आदर्श विद्यानिकेतन गुरुकुल कोल्हापूर), धनश्री शितल मगदूम (आदर्श विद्यानिकेतन गुरुकुल कोल्हापूर) यांनी सुवर्णपदक पटकावले.
सार्थक सुनील लोखंडे (आदर्श विद्यानिकेतन मिणचे कोल्हापूर), साई अभिजीत निकम (आदर्श विद्यानिकेतन मिणचे कोल्हापूर), सर्वेश रुपेश कोगनोळे (आदर्श विद्यानिकेतन मिणचे), ओम शंकर सूर्यगंध (आदर्श विद्यानिकेतन मिणचे), विराज विठ्ठल रणवरे (आदर्श विद्यानिकेतन मिणचे), प्रतीक्षा निवास पाटील (आदर्श विद्यानिकेतन गुरुकुल कोल्हापूर) यांनी रौप्यपदक पटकावले.
या स्पर्धेत पंच म्हणून युनिफाईट असोसिएशन कोल्हापूरचे सचिव सतीश वडणगेेकर यांनी काम पाहिले. या खेळाडूंना युनिफाईट संघटनेचे अध्यक्ष कुलदीप पाडळकर यांचे प्रोत्साहन तर रोहित काशीद, स्तवन सोरटे, कृष्णात कांबळे, प्रशांत चोपडे यांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
25.3 ° C
25.3 °
25.3 °
38 %
2.8kmh
64 %
Sun
27 °
Mon
26 °
Tue
26 °
Wed
26 °
Thu
26 °

Most Popular

You cannot copy content of this page