• ६७ इच्छुकांनी केली उमेदवारीची मागणी
कोल्हापूर :
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) च्या इच्छुकांच्या मुलाखती उत्साहात पार पडल्या. जवळपास ६७ इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील राष्ट्रवादी कार्यालयात या मुलाखती झाल्या. जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे, महिला शहराध्यक्ष पद्मजा तिवले, जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. अनिल घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलाखती पार पडल्या.
इंडिया आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) हा एक घटक आहे. त्यामुळे इंडिया आघाडी प्रमुख सतेज डी. पाटील यांच्याकडे यापूर्वीच २१ जागांची मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागात एक उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला पाहिजे अशी पहिल्यापासूनची आग्रही भूमिका आहे. त्या अनुषंगाने रविवारी (दि.२१) पक्ष कार्यालयात उत्साहात मुलाखती पार पडल्या.
सर्व मुलाखती झालेल्या उमेदवारांची यादी ही प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असून त्याच पद्धतीने महाविकास आघाडीकडे देखील यादी पाठवण्यात येईल. येत्या दोन दिवसात कोल्हापूर जिल्हा इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख घटकांची एकत्रित बैठक संपन्न होईल. त्या बैठकीमध्ये अंतिम चर्चा होईल, असे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील व शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जवळपास ६७ उमेदवारांनी मागणी केली आहे. त्यापैकी ३९ मुलाखती पार पडल्या आहेत. सर्वांनीच पक्षाबरोबर पक्षाचा आदेश आम्ही मान्य करू असे मुलाखती दरम्यान सांगितले आहे. उच्च उच्चविद्याभूशीत प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इंजिनियर अशा लोकांनी या मुलाखती दिल्या आहेत.
मुलाखत दिलेल्या इच्छुकांमध्ये प्रा. डॉ. लक्ष्मण करपे, प्रशांत पाटील, लता अरुण जोंधळे, मकरंद जोंधळे, राजवर्धन यादव, सोहेल बागवान, शिवानी बाजीराव खाडे, सुरेखा रामराजे बदाल, रामराजे बदाले, धनश्री गणेश जाधव, गणेश जाधव, रियाज कागदी, हिदायत मणेर, फिरोज सरगूर, सादिक अत्तार, माजी नगरसेविका पद्मजा तिवले, माजी नगरसेवक रमेश पोवार, चंद्रकांत सूर्यवंशी, सोनू चौगुले, किसन कल्याणकर, निलोफर बागवान, अकबर महात, हिदायत मणेर, दिशा निरंजन कदम, हाजी वहिदा साजिद खान उस्ताद
सायरा आयुब नंदीकुरळे,ॲड. अनिल घाटगे,
गणेश नलावडे, सारिका अवधूत पाटील, नागेश नारायण जाधव, मृणालिनी गणेश जाधव, बबलू दयावान चौगुले, रंजीता नारायण चौगुले, निरंजन कदम, तुषार महादेव गुरव, दिनकर लक्ष्मण कांबळे, डॉ. रूपाली अमोल बावडेकर, प्रा. हर्षल हरिदास धायगुडे अशा ३९ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. अद्याप १६ जणांच्या मुलाखती घेणे बाकी आहेत.
——————————
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ३९ इच्छुकांच्या मुलाखती
Mumbai
smoke
32
°
C
32
°
31.9
°
22 %
3.6kmh
16 %
Tue
32
°
Wed
28
°
Thu
27
°
Fri
26
°
Sat
26
°

