Homeराजकियप्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी निवडणूक प्रक्रियेचा घेतला आढावा

प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी निवडणूक प्रक्रियेचा घेतला आढावा

• आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना
कोल्हापूर :
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५साठी सोमवारी सायंकाळपासून आचारसंहिता लागू झाली. त्या अनुषंगाने प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी मंगळवारी सकाळी महापालिकेतील छत्रपती ताराराणी सभागृहात निवडणूक प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी मार्गदर्शन करताना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आजच त्यांच्या नियुक्त निवडणूक कार्यालयांची पाहणी करून आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत की नाही याची खात्री करावी व तात्काळ कार्यालयीन कामकाज सुरू करण्याच्या सूचना दिल्या. या कार्यालयात आवश्यक कर्मचारी नियुक्ती आजच पूर्ण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
शहरात एकूण ५८१ मतदान केंद्रे असून मतदान केंद्रनिहाय याद्यांची तपासणी तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विभागीय कार्यालये व अतिक्रमण विभागामार्फत शहरातील सर्व होर्डिंग्ज, बॅनर व फ्लेक्स मंगळवारी दुपारपर्यंत काढून टाकण्याचे निर्देश दिले.
शहरात सात ठिकाणी निवडणूक कार्यालये स्थापन करण्यात आली असून, त्या कार्यालयांतून संबंधित प्रभागांची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. उमेदवारांचे नामनिर्देशन, छाननी, निवडणूक साहित्य वाटप तसेच मतदानानंतर मतदान यंत्रे स्वीकारण्याची कार्यवाही या कार्यालयांतून होणार आहे.
मतदान जनजागृतीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रांगोळी, विद्यार्थ्यांमधील विविध स्पर्धा, प्रभात फेरी, रेल्वे स्टेशन, बस स्थानके व प्रमुख चौकांत जनजागृती उपक्रम राबवावेत. सायकल व दुचाकी रॅली, फ्लेक्स बोर्ड तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्याच्या सूचनाही दिल्या.
प्रभागांमध्ये होणाऱ्या कोपरा सभा, मोठ्या सभा व रॅली यांवर संबंधित निवडणूक कार्यालये व निर्णय अधिकाऱ्यांनी सतत लक्ष ठेवून वेळोवेळी पथकांमार्फत तपासणी करावी. उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाच्या विवरणाची तपासणी करावी तसेच सोशल मीडियावर फिरणारे संदेश व व्हिडीओ यावर लक्ष ठेवून मतदारांना प्रलोभन देणारे आक्षेपार्ह साहित्य आढळल्यास तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले ले. निवडणूक कार्यालयांमध्ये नागरिकांच्या मदतीसाठी स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करावेत. उमेदवारांना ‘ना हरकत दाखला’ देण्यासाठी राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील हॉलमध्ये स्वतंत्र एकखिडकी व्यवस्था सुरू करण्यात येणार असून संबंधित विभागांचे कर्मचारी सीएफसी मार्फत शुल्क स्वीकारून ना हरकत दाखले देण्यात येणार आहेत.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, निवडणूक निर्णय अधिकारी रुपाली चौगुले, सुशिल संसारे, संदीप भंडारे, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी गायगोपाळ, विजय जाधव, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाने, कृष्णा पाटील, पोलिस उपनिरिक्षक अभिजीत इंगळे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, मुख्य लेखाधिकारी राजश्री पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव सुनील बिद्रे, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार, निवडणूक अधिक्षक सुधाकर चल्लावाड, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, कामगार अधिकारी राम काटकर, रवका  अधिकारी प्रशांत पंडत, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. विजय पाटील, शाहूपुरी पोलिस स्टेशनचे व्ही. ए. पाटील, परवाना अधिक्षक अशोक यादव, पवडी अकौटंट प्रिती घाटोळे, कनिष्ठ अभियंता उमेश बागूल, अक्षय आटकर, चेतन आरमाळ आदी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
25 ° C
25 °
25 °
41 %
2.1kmh
20 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
26 °
Sun
27 °

Most Popular

You cannot copy content of this page