Homeकला - क्रीडाराष्ट्रीय स्कुल गेम्स बुद्धिबळ स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक 

राष्ट्रीय स्कुल गेम्स बुद्धिबळ स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक 

• मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाला रौप्यपदक
कोल्हापूर :
बेंगळुरू येथे पार पडलेल्या स्कुल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया च्यावतीने आयोजित ६९व्या राष्ट्रीय स्कुल गेम्स (१९ वर्षाखालील) बुद्धिबळ स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्र संघाने लक्षवेधी कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. तर, मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाला रौप्यपदक मिळाले.
स्पर्धेत मुलींच्या गटात सहाव्या फेरीत श्रावणी उंडाळे, अनुष्का कुतवळ, श्रुती काळे, दिव्या पाटील यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने कर्नाटक संघाचा ३.५ गुण-०.५ गुण असा पराभव करून विजेतेपद पटकावले. यामध्ये महाराष्ट्र संघाने सहाव्या फेरीअखेर सर्व फेऱ्यांमध्ये विजयी कामगिरी करत एकूण ६ गुणांची कमाई केली.
मुलांच्या गटात अखेरच्या फेरीत सुयोग वडके, गौरांग बागवे, अरविंद अय्यर, अर्णव कदम यांनी केलेल्या खेळीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने सीबीएससी संघाला २ गुण-२ गुण असे बरोबरी रोखले. यामध्ये महाराष्ट्र संघाने सहा फेऱ्यांमध्ये ४ विजय व २ बरोबरीसह रौप्यपदक पटकावले.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24 ° C
24 °
24 °
33 %
2.1kmh
0 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
27 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page