कोल्हापूर :
बेंगलोर येथे भारतीय शालेय क्रीडा महासंघाने आयोजित केलेल्या १९ वर्षाखालील मुला-मुलींच्या शालेय राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत मुलींच्या गटात द्वितीय मानांकित महाराष्ट्र संघाने सहापैकी सहा सामने जिंकत अपराजित राहून सुवर्णपदक मिळविले. यामध्ये कोल्हापूरच्या दिव्या पाटीलने तिसऱ्या पटावर खेळताना सहा पैकी साडेपाच गुण मिळवून वैयक्तिक सुवर्ण पदक मिळविले. महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देण्यात दिव्या पाटीलने सिंहाचा वाटा उचलला.
मुलींच्या विजेत्या महाराष्ट्र संघात कोल्हापूरच्या दिव्या पाटीलसह श्रावणी उंडाळे- पुणे, अनुष्का कुतवळ- पुणे, श्रुती काळे- छत्रपती संभाजीनगर व देवांशी गावंडे- अकोला यांचा समावेश होता. या १९ वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेत देशातील ३२ संघ सहभागी झाले होते. स्विस लीग पद्धतीने एकूण सहा फेऱ्यात स्पर्धा घेण्यात आली. पहिल्या फेरीत महाराष्ट्रने गुजरातचा चार विरुद्ध शून्य गुणांनी पराभव करून नेत्रदिपक सुरुवात केली.
दुसऱ्या फेरीत आयपीएससी संघाला महाराष्ट्राने साडेतीन विरुद्ध अर्ध्या गुणांनी नमविले. तिसऱ्या फेरीत केरळचा चार विरुद्ध शून्य गुणाने फडशा पाडून आघाडी घेतली. महत्त्वाच्या चौथ्या फेरीत अग्रमानांकित सीबीएससीला महाराष्ट्राने साडेतीन विरुद्ध अर्ध्या गुणांनी धूळ चारून आपली आघाडी मजबूत केली. पाचव्या फेरीत तृतीय मानांकित तामिळनाडू विरुद्ध महाराष्ट्राने अडीच विरुद्ध दीड गुणाने बाजी मारत अजिंक्यपद जवळजवळ निश्चित केले. औपचारिक अंतिम सहाव्या फेरीत दुबळ्या कर्नाटकचा साडेतीन विरुद्ध अर्ध्या गुणांनी पराभव करून सर्व सहाच्या सहा सामने जिंकून महाराष्ट्राने मोठ्या दिमाखात अजिंक्यपद पटकावले.
एकूण २४ पैकी २० गुण महाराष्ट्राने पटकविले. त्यामध्ये कोल्हापूरच्या दिव्या पाटील व पुण्याच्या अनुष्का कुतवलने प्रत्येकी साडेपाच गुण मिळवून सिंहाचा वाटा उचलला. छत्रपती संभाजीनगरच्या श्रुती काळेने व पुण्याच्या श्रावणी उंडाळेने प्रत्येकी चार गुण केले तर अकोलाच्या देवांशी गावडेने एक गुण केला.
दिव्या पाटीलने यापूर्वी दोनवेळा राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला रौप्यपदक मिळवून दिले होते. दिव्या जयसिंगपूर येथील जयप्रभा इंग्लिश मेडियम ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीत शिकत आहे. कॉलेजच्या प्राचार्या सौ. स्मिता पाटील व क्रीडा शिक्षक राहुल सरडे, चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, सचिव व फिडे इन्स्ट्रक्टर मनिष मारुलकर, दिव्याची आई कविता पाटील व वडील शरद पाटील या सर्वांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले तर बुद्धिबळ प्रशिक्षक इचलकरंजीचे रोहित पोळ, कोल्हापूरचे उत्कर्ष लोमटे व सोलापूरचे सुमुख गायकवाड यांचे विशेष बुद्धिबळ प्रशिक्षण दिव्याला आजपर्यंत लाभले आहे.
——————————
दिव्या पाटीलला शालेय राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24
°
C
24
°
24
°
33 %
2.1kmh
0 %
Wed
29
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
27
°
Sun
28
°

