Homeकला - क्रीडादेवल क्लबतर्फे सायंकालीन संगीत सभेचे आयोजन

देवल क्लबतर्फे सायंकालीन संगीत सभेचे आयोजन

कोल्हापूर :
प्रतिभावान, उमलत्या, युवा कलाकारांना सादरीकरणासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी एनसीपीए मुंबई, गायन समाज देवल क्लब आणि सिटी बँक यांच्या सहसंयोजनाने विशेष सायंकालीन संगीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या संगीत सभेत श्रीमती अपर्णा पणशीकर (पुणे) यांचा शास्त्रीय गायनाविष्कार गुरुवारी (दि. १८) सायंकाळी ६ वाजता संस्थेच्या बाळासाहेब घाटगे दालनामध्ये आयोजित करण्यात आला आहे.
श्रीमती अपर्णा पणशीकर यांचे संगीताचे पहिले गुरु पं. भास्करबुवा  जोशी होत. सध्या श्रीमती अपर्णा यांना मातोश्री श्रीमती मीरा पणशीकर यांचेकडून गायनाची तालीम मिळत आहे. त्यांनी आर्य संगीत प्रसारक मंडळाचा सवाई गंधर्व भीमसेन फेस्टिवल, पुणे गान सरस्वती संगीत महोत्सव, दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे आपला गायनाविष्कार सादर केला आहे. याशिवाय त्यांना रसिकाग्रणी दत्तोपंत देशपांडे पुराकाराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच गांधर्व महाविद्यालयाचा युवा गायक पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्याचप्रमाणे दक्षिण कोरिया, इंग्लंड, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया या देशांचा कार्यक्रमच्या निमित्ताने दौरा त्यांनी केला आहे. आकाशवाणीच्या ‘अ’ दर्जा प्राप्त कलाकार असलेल्या अपर्णा यांनी अनेक चित्रपटांमधून संगीत दिले असून त्यांनी  काही अल्बमही केले आहेत.
कार्यक्रमाला तबला व संवादिनीची पूरक साथ संजय देशपांडे व ओजस रानडे करीत आहेत. सर्वांसाठी विनामूल्य असणाऱ्या या संगीत सभेचा लाभ संगीतप्रेमी रसिकांनी घेण्याचे आवाहन श्रीकांत डिग्रजकर यांनी केले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24 ° C
24 °
24 °
33 %
2.1kmh
0 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
27 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page