Homeशैक्षणिक - उद्योग विवेकानंद कॉलेज हे विद्यार्थ्यांमधील क्षमतांना बळकट करणारे समृद्ध व्यासपीठ

विवेकानंद कॉलेज हे विद्यार्थ्यांमधील क्षमतांना बळकट करणारे समृद्ध व्यासपीठ

• विंग कमांडर गजानन हरळीकर यांचे प्रतिपादन
कोल्हापूर :
शिक्षण विभागाने घालून दिलेल्या अभ्यासक्रमांच्या आकलनासोबत आपल्यातील सुप्त क्षमताना व्यासपीठ देऊन त्या करिअरच्या संधीमध्ये रूपांतरित करण्यासाठीचे ज्ञान केंद्र म्हणजे विवेकानंद कॉलेज आहे. कॉलेजमधील आणि उपलब्ध असणाऱ्या सुविधा या आपल्या अंतर्गत मुलांना गतिमान करून स्पर्धेच्या युगात अस्तित्व टिकविण्याची संजीवनी देते, असे मत भारतीय वायुसेना विंग कमांडर गजानन हरळीकर यांनी मांडले.
विवेकानंद कॉलेजच्यामध्ये विद्यार्थी सक्षमीकरण आणि करिअर समुपदेशन या कार्यक्रमात गजानन हरळीकर यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. रोजगाराच्या उपलब्ध संधी, सरकारी नोकऱ्यांमधून मिळणारी प्रतिष्ठान आणि व्यावसायिक शिक्षणाची दर्पण यामधून पारंपारिक शिक्षणात प्रवास करत असताना आपल्या ऊर्जेचा संयोग साधून यश प्राप्ती करण्यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे, असेही त्यांनी मार्गदर्शनपर भाषणात नमूद केले.
विवेकानंद कॉलेज हे पारंपारिक शिक्षणातील अग्रक्रमाने येणारे असले तरी येथील शिक्षणाची आणि यशाची गुणवत्ता विद्यार्थ्यांच्या समर्पण भावनेने तयार झाली आहे, असे ज्युनिअर सायन्स विभाग स्टाफ सेक्रेटरी प्रा. सुदर्शन शिंदे यांनी स्वागतपर भाषणात सांगितले. यावेळी विश्रामबाग सांगलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा यांनी केले. आभार प्रा. किशोर गुजर यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. एल. एस. नाकाडी यांनी केले. कार्यक्रमासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्था सीईओ कौस्तुभ गावडे, प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात, प्रा. गीतांजली साळुंखे, प्रा. सौ. शिल्पा भोसले, प्रा. मुकुंद नवले, प्रा. किशोर गुजर, प्रा. हेमंत पाटील, मेजर सुनिता भोसले, आयक्यूएसी प्रमुख डॉ. श्रुती जोशी, कर्नल मानस दीक्षित, कर्नल विक्रम नलावडे व कार्यालयीन कर्मचारी वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
28 ° C
28 °
25.9 °
36 %
4.6kmh
20 %
Mon
28 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
27 °

Most Popular

You cannot copy content of this page