Homeशैक्षणिक - उद्योग विवेकानंदमध्ये औषधांचे रासायनिक पृथ्थकरण व दर्जा या विषयावर कार्यशाळा

विवेकानंदमध्ये औषधांचे रासायनिक पृथ्थकरण व दर्जा या विषयावर कार्यशाळा

कोल्हापूर :
विवेकानंद महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे Analytical Techiques Application in Pharmaceutical Anlysis and Quality Control या विषयावरील  कार्यशाळा अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत संपन्न झाली.
अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत (न्यू कॉलेज क्लस्टर) पार पडलेल्या या कार्यशाळेत बी. एस्सी. व एम. एस्सी. (रसायनशास्त्र) विषयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत (न्यू कॉलेज क्लस्टर) असलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
या कार्यशाळेत विषय तज्ज्ञ म्हणून भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेजचे डॉ. रवींद्र गायकवाड व इन्स्टा व्हिजन साताराचे डॉ. अजित एकल यांनी Analytical Techniques व उपकरणे यांचा औषधांच्या उत्पादनामध्ये कसा उपयोग होतो, (औषधांचे रासायनिक पृथ्थ्‍करण) तसेच औषधांचे पृथ्थ्‍करण, दर्जा कसा टिकवून लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते याविषयी सहभागी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच या क्षेत्रामधील विविध नोकऱ्यांची संधी व विषयाचे महत्व पटवून दिले. या कार्यशाळेमध्ये OJT-on Job Training (NEP नुसार) बी. एस्सी. भाग-३ व एम. एस्सी. च्या विध्यार्थ्यांना संकल्पना समजावून सांगून त्याच्या पूर्ततेसाठी मार्गदर्शन केले.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात, आयक्यूएसी समन्यव्यक डॉ. श्रुती जोशी, अग्रणी महाविद्यालय समिती समन्वयक डॉ. सौ. वर्षा म्हैंदरगी व विवेकानंद महाविद्याल्याचे अग्रणी महाविद्यालय समन्वयक डॉ. व्ही. बी. वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेसाठी रसायनशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक वर्ग, लीड कॉलेज समन्वयक (रसायनशास्त्र विभाग) डॉ. ए. एस. तपासे, विभागप्रमुख डॉ. एस. डी. शिर्के तसेच रजिस्ट्रार एस. के. धनवडे, प्रशासकीय स्टाफ यांनी प्रयत्न केले.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
29 ° C
29 °
29 °
61 %
2.6kmh
6 %
Mon
28 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °

Most Popular

You cannot copy content of this page