कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (केडीसीए)चा खेळाडू रणजीत निकम याची बीसीसीआय मार्फत घेतल्या जाणाऱ्या टी-२० स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे. सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठी ही निवड झाली आहे. रणजीत निकमची सलग तिसऱ्या वर्षी निवड झाली आहे.
स्पर्धा २६ नोव्हेंबर ते ८ डिसेंबरपर्यत कोलकत्ता येथे होणार आहे. हि स्पर्धा टी-२० असुन महाराष्ट्र संघाचा एलिट गटात समावेश आहे. या गटात महाराष्ट्रासह जम्मू काश्मीर, हैद्राबाद, छत्तीसगड, बिहार, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व गोवा या आठ संघाचा समावेश आहे.
रणजीत निकम २०१० पासून कोल्हापूर जिल्हा १६, १९, २३ व खुला गट संघातुन खेळत आहे. सन २०१९-२० यावर्षी २३ वर्षाखालील महाराष्ट्र संघातून खेळताना त्याने गुजरात, कर्नाटक व मध्यप्रदेश या संघांविरूध्द खेळताना सलग तीन सामन्यात तीन शतके झळकावली. या कामगिरीच्या जोरावर २०२०-२१च्या महाराष्ट्र रणजी संघात निवड झाली होती. या कामगिरीच्या जोरावर तसेच या वर्षीच्या कॅम्पमध्ये व सराव सामन्यात केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर त्याची सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठी तिसऱ्या वर्षी देखील निवड झाली आहे.
महाराष्ट्र प्रिमियर लिग २०२५ या स्पर्धेचे विजेतेपद ईगल नाशिक टायटन्स या संघाने पटकावले. या विजयी संघात रणजीत निकमने अंतिम सामन्यात १३ चेंडूत नाबाद ३१ धावांची महत्वपुर्ण खेळी केली होती. महाराष्ट्र संघातील पॄथ्वी शाॅ, ऋतुराज गायकवाड, अर्शीन कुलकर्णी, मुकेश चौधरी, रामकॄष्ण घोष या आपीएल खेणाऱ्या खेळाडूंच्या बरोबर रणजीतला खेळण्याचा अनुभव मिळणार आहे.
रणजीत निकमची टी-२० महाराष्ट्र संघात निवड
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30
°
C
30
°
27.9
°
54 %
3.6kmh
1 %
Mon
29
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°

