Homeकला - क्रीडाडी. वाय. पाटील 'कृषी'च्या रोहित पाटीलला गोळाफेक आणि थाळीफेकमध्ये सुवर्णपदक

डी. वाय. पाटील ‘कृषी’च्या रोहित पाटीलला गोळाफेक आणि थाळीफेकमध्ये सुवर्णपदक

कोल्हापूर :
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत झालेल्या आंतर महाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धेत डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय तळसंदेच्या रोहित पाटील या खेळाडूने गोळाफेकमध्ये सलग दुसऱ्यावर्षी सुवर्ण पदक जिंकले. तसेच थाळीफेकमध्येही सुवर्ण पदक प्राप्त केले.  या स्पर्धेत दुहेरी सुवर्ण पदकाची कमाई करत रोहितने विद्यापीठ संघात स्थान मिळवले आहे.
सांगली येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये १० जिल्ह्यांमधील २५ महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतलेला होता. डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्या रोहित पाटील याने स्पर्धेमध्ये १२.१ मीटर गोळाफेक तर ३३.६३ मीटर थाळीफेक करत दोन्ही प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. २७व्या महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव स्पर्धेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संघामध्ये त्याने आपले स्थान निश्चित केले आहे.
या स्पर्धेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल महाविद्यालयाच्यावतीने रोहित पाटील याचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, प्राचार्य प्रा. डी. एन. शेलार, अकॅडमीक इन्चार्ज. पी. डी. उके, आर. आर. पाटील, विद्यार्थी कल्याण अधिकारी ए. बी. गाताडे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी यशस्वी  खेळाडू व प्रशिक्षक प्रा. ए. एस. बंद्रे यांचे अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30 ° C
30 °
27.9 °
28 %
4.1kmh
0 %
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page