कोल्हापूर :
मयूर स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कुमुद गयावळ महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात कॅलेक्स स्पोर्ट्स अकॅडमीने सेंच्युरियन क्रिकेट अकॅडमीवर २७ धावांनी मात केली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कॅलेक्स स्पोर्ट्स अकॅडमीने ३६.३ षटकांमध्ये सर्वबाद १५९ धावा केल्या. यामध्ये अंकिता भारती ३७ धावा, संजना वाघमोडे २७ धावा, मधुरा इंगवले २२ धावा व साक्षी पाटीलने २० धावा केल्या.
सेंच्युरियन क्रिकेट अकॅडमीकडून गोलंदाजी करताना समीक्षा पाटील २६ धावात ३ बळी, पवित्रा महाडिक २८ धावांमध्ये ३ बळी, सुदिक्षा देसाई २८ धावांमध्ये २ बळी, वृंदामेढे व वेदिका पाटील प्रत्येकी १ बळी घेतला.
प्रत्युत्तर दाखल खेळताना सेंच्युरियन क्रिकेट अकॅडमीचा संघ ४० षटकामध्ये ७ बाद १३२ धावा करू शकला. सेंच्युरियन क्रिकेट अकॅडमीकडून साक्षी पोद्दार हिने ७८ धावा करून चिवट झुंज दिली. परंतु तिची झुंज व्यर्थ ठरली. कॅलेक्स स्पोर्ट्स अकॅडमीकडून संजना वाघमोडेने ८ षटकांमध्ये ९ धावा देऊन २ बळी, मधुरा इंगवले ३२ धावांमध्ये ३ बळी व साक्षी पाटील व मिसबा सय्यद यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. अशाप्रकारे कॅलेक्स स्पोर्ट्स अकॅडमीने सेंच्युरियन क्रिकेट अकॅडमीवर २७ धावांनी पराभव करून सामना जिंकला.
कॅलेक्स स्पोर्ट्स अकॅडमीची सेंच्युरियन क्रिकेट अकॅडमीवर मात
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
27
°
C
27
°
27
°
47 %
3.6kmh
0 %
Mon
27
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
29
°

