कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाबाई डिफेन्स बॅडमिंटन अकॅडमी येथे घेण्यात आलेल्या कोल्हापूर झोनल महिला व पुरुष बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विवेकानंद कॉलेजच्या महिला व पुरुष बॅडमिंटन संघाने सुवर्णपदक पटकावले. या संघाने अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आष्टा येथे होणाऱ्या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत इंटरझोनल महिला व पुरुष बॅडमिंटन स्पर्धेकरिता स्थान निश्चित केले.
या खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के. धनवडे व सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————————————-
विवेकानंद कॉलेजचा महिला व पुरुष बॅडमिंटन संघ इंटरझोनल स्पर्धेसाठी पात्र
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
27
°
C
27
°
27
°
47 %
3.6kmh
0 %
Mon
27
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
29
°

