कोल्हापूर :
ज्येष्ठ चित्रकार कै. डी. व्ही. वडणगेकर यांना चित्रकलेच्या प्रात्यक्षिकांतून अभिवादन करण्यात आले. दि. वि. फाउंडेशनच्यावतीने २४ ऑक्टोबरला शाहूपुरी कुंभार गल्ली येथे दि. वि. फाउंडेशन आर्ट गॅलरीमध्ये चित्रकार कै. डी. व्ही. वडणगेकर यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त चित्रकलेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
प्रारंभी कै. डी. व्ही. वडणगेकर यांच्या प्रतिमेचे पूजन महादेव वडणगेकर, सौ. सुनंदा वडणगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नामवंत चित्रकार विजय उपाध्ये यांनी जलरंग (वॉटर कलर) मध्ये निसर्गचित्रांचे प्रात्यक्षिक सादर केले. चित्रकार रुपेश चौगुले यांनी चित्रकलेविषयी माहिती दिली. तसेच शिल्पकार व चित्रकार यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अमोल आरेकर, उमेश कुंभार, महेश सडोलीकर, रमेश वडणगेकर, राजेश वडणगेेकर (मुंबई), सौ. अलका माजगावकर, सौ. संगीता वास्कर, सौ. धनश्री बावडेकर आदींसह बालकलाकार तसेच तरुण हौशी चित्रकार, ज्येष्ठ कलाकार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतिश वडणगेकर यांनी केले. आभार दिनकर कुंभार यांनी मानले.
——————————————————-
ज्येष्ठ चित्रकार कै. डी. व्ही. वडणगेकर यांना चित्रकलेच्या प्रात्यक्षिकांतून अभिवादन
RELATED ARTICLES
Mumbai
haze
25
°
C
25
°
25
°
69 %
0kmh
0 %
Sun
26
°
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

