• ओमकार वडर, मोहम्मद शेख व ईश्वरी पाटील यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
कोल्हापूर :
राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत कोल्हापूरचा डंका वाजला. कोल्हापूरच्या तिघांची एकाचवेळी निवड झाली. प्रथमच अशाप्रकारे निवड झाली आहे.
ग्वाल्हेर येथे होणाऱ्या ५० व्या राष्ट्रीय ज्युनिअर कॅरम स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या तिघांची निवड झाली आहे. मुलांमध्ये ओमकार वडर व मोहम्मद तजीम शेख तर मुलींमध्ये ईश्वरी पाटील यांची एकाचवेळी राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी प्रथमच निवड झाली आहे.
मुंबई येथे ५९वी ज्युनियर, युवा कॅरम स्पर्धा महाराष्ट्र कॅरम असोसिएशन राज्य निवड चाचणी स्पर्धांचे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव आतंरराष्ट्रीय कॅरमपटू
अरुण केदार यांचे मार्गदर्शनाखाली व सेन्ट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट यांच्यावतीने आयोजित करण्यात आले होते.
या स्पर्धेत १८ वर्षाखालील मुलांमध्ये पुण्याचा आयुष्य गरूड, मुलींमध्ये मुंबईच्या सोनाली कुमारीने तर २१ वर्षाखालील युवा गटात रत्नागिरीची शिवछत्रपती पुरस्कार विजेती आकांक्षा कदम व मुलांमध्ये मुंबईच्या मिहिर शेख यांनी विजेतेपद मिळविले.
निवड चाचणी स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील मुला-मुलींमध्ये १६० कॅरमपटू सहभागी झाले होते. पुढील राष्ट्रीय स्पर्धा ग्वाल्हेर येथे १ ते ४ नोव्हेंबर दरम्यान होत आहे.
ओमकार वडर, मोहम्मद तजीम शेख तर मुलींमध्ये ईश्वरी पाटील यांची निवड झाली. या यशाबद्दल असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विवेक घाटगे, उपाध्यक्ष डॉ. अभिजित पाटील, मुरलीधर गावडे, राजू मेवेकरी, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सहसचिव अभिजित मोहिते, पदाधिकारी भालचंद्र पुजारी, कौस्तुभ गावडे, जयवंत नलावडे, प्रा. विराज जाधव, नामदेव ठमके, अख्तर शेख, गौरव हुदले, राजू वडर, अस्लम शेख आणि धैर्यशील पाटील यांचे बहुमोल सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
——————————————————-
महाराष्ट्र राज्य निवड चाचणी कॅरम स्पर्धेत कोल्हापूरचा डंका
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24
°
C
24
°
24
°
50 %
2.1kmh
0 %
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
28
°

