Homeसामाजिकरेवताबाई ट्रस्टने केली उपेक्षित कातकरी समाज बांधवांबरोबर दिवाळी साजरी

रेवताबाई ट्रस्टने केली उपेक्षित कातकरी समाज बांधवांबरोबर दिवाळी साजरी

कोल्हापूर  :
राधानगरी पैकी भैरीबांबर येथील उपेक्षित कातकरी समाजातील लोकांना दिवाळी सणासाठी फराळाचे साहित्य आणि दिवाळी देऊन खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करण्याचे काम रेवताबाई एकावडे ट्रस्टने केले. गेली आठ वर्षे दिवाळीचे औचित्य साधून ट्रस्टच्यावतीने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येतो.
राधानगरी तालुक्यातील रेवताबाई एकावडे चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने गेलीे आठ वर्षे गरीब, गरजू, दुर्गम भागातील लोकांना दिवाळी सणात भैरीबांबर येथील कातकरी समाज बांधवांना कपडे, फराळाचे साहित्य देऊन दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न केला.
गेल्या शंभर वर्षाहून अधिक काळ कातकरी समाज इथल्या माळावर वास्तव करत असून कोणत्याच मूलभूत सुविधा उपलब्ध नसताना जीवन व्यतीत करत आहेत. चारी बाजूला घनदाट जंगल अशातच हा समाज राहत असून त्यांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, यासाठी कपडे आणि फराळाचे साहित्य वाटप केले असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष प्रल्हाद एकावडे यांनी सांगितले.
या कुटुंबांना दिवाळीचे साहित्य मिळाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी राधानगरी धरण उभारणीसाठी या समाजातील लोकांना येथे आणले होते. धरण उभारणीनंतर या समाजाला रोजगार मिळाला नाही, त्यामुळे या समाजातील लोकांनी जंगलातील तमालपत्री आणि औषधी झाडपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. मात्र वन्यजीव विभागाच्या जाचक अटीमुळे या समाजावर बेकारीची कुराड कोसळल्यानं मोठी परवड झाली. मात्र रेवताबाई एकावडे ट्रस्टने त्यांना दिवाळीच्या माध्यमातून साहित्य देऊन धीर देण्याचे काम केले.
यावेळी राधानगरीच्या माजी सरपंच कविता शेट्टी, विलास रणदिवे, सिया पालकर, ऋषिकेश पालकर, प्रल्हाद एकावडे, वृषाली एकावडे, प्रणित एकावडे, लहू कोंडवळ, श्रीपती निकम, वासंती निकम यांच्यासह कातकरी समाजबांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30 ° C
30 °
27.9 °
42 %
3.1kmh
20 %
Thu
28 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
26 °
Mon
27 °

Most Popular

You cannot copy content of this page