Homeकला - क्रीडासांगली चॅम्प्सची विजयी सलामी

सांगली चॅम्प्सची विजयी सलामी

कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व मयूर स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कुमुद गयावळ महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेला रविवारी भाऊराव पाटील ग्राऊंडवर सुरुवात झाली. यामध्ये सांगली चॅम्प्स संघाने बल्लाळेश्वर क्रिकेट अकॅडमीवर मात करून विजयी सलामी दिली.
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अभिजीत भोसले, सचिव मदन शेळके, सहसचिव कृष्णा धोत्रे, संचालक रमेश हजारे, जनार्दन यादव, मयूर स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष केदार गयावळ, वैभव पाटील, पंच प्राजक्ता घाडगे, आशुतोष पाटील, स्कोरर अंकिता भारती यांची उपस्थिती होती.
केतन गयावळ यांनी स्वागत केले. सामन्याची नाणेफेक सौ. कल्याणी गयावळ यांचे हस्ते करण्यात आली. नाणेफेकीचा कौल बल्लाळेश्वर क्रिकेट अकॅडमीकडून लागल्यानंतर त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बल्लाळेश्वर अकॅडमीने ३७.४ षटकांमध्ये सर्व बाद १८० धावा केल्या. यामध्ये स्नेहा पटेल ६८ धावा, सायली मोहिते ३१ धावा व जानवी गोडसे २४ धावा केल्या. सांगली च्याम्पस कडून कृषी ठक्कर ३ बळी, अनुश्री २ बळी, ज्योती शिंदे, सरस्वती कोकरे, भावी पुनमिया यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
प्रत्युत्तर दाखल खेळताना सांगली चॅम्प्सने ३२.१ षटकामध्ये ४ बाद १८१ धावा केल्या. यामध्ये सरस्वती कोकरे नाबाद ५०, श्रेया जेऊर ३८, स्नेहल टकले नाबाद २२, रितू जमादार १८ व कृषी ठक्कर १७ धावा केल्या. बल्लाळेश्वर अकॅडमीकडून साक्षी डांगे, वैष्णवी भंडारे, आदिती साळुंखे व प्राची कुलकर्णी यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. अशाप्रकारे सांगली चॅम्पसने विजय संपादन केला.
——————————————————

RELATED ARTICLES
Mumbai
haze
24 ° C
24 °
24 °
69 %
3.6kmh
0 %
Mon
28 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
26 °

Most Popular

You cannot copy content of this page