• प्रथम क्रमांकास तब्बल १ लाखाचे बक्षीस
कोल्हापूर :
दिवाळीचा सण म्हणजे आनंद, मांगल्य आणि परंपरेचा उत्सव. या सणात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच सहभाग असतो. दिवाळी म्हटली की किल्ल्यांची आठवण आलीच, कारण ही परंपरा आपल्या इतिहासाची आणि संस्कृतीची जपणूक करते. या सांस्कृतिक वारशाला पुढे नेण्यासाठी भारतीय जनता पार्टी कोल्हापूर च्यावतीने भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा २२ ते २६ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
शहरातील ८१ प्रभागांतर्गत ही स्पर्धा असून या किल्ले बांधणी स्पर्धेसाठी युनेस्को अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश स्पर्धकांनी करणे बंधनकारक असणार आहे. हे किल्ले पुढीलप्रमाणे
रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी, जिंजी (तामिळनाडू).
किल्ला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकास तब्बल १ लाख, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस ७५ हजार आणि तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस ५० हजार असे आहे. या स्पर्धेमध्ये नाव नोंदवण्यासाठी गुगल लिंक द्वारे नोंदणी करावयाची आहे. नाव नोंदणीसाठी अंतिम दिनांक २३ ऑक्टोबर सायंकाळी ६ पर्यंत असणार आहे.
गुगल लिंक
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSft4IM13UKvhm7Q_A8nTgWlcpVcGc6pbddhs-PQYaGB7QzjTA/viewform?usp=dialog
तरी कोल्हापूर शहरातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी भाजपा जिल्हा कार्यालय नागाळा पार्क येथे शंतनु मोहिते – ९६६९७६६९५५ आणि
शिवरत्न मेटिल ७६२०४१७६६७ संपर्क साधावा.
भाजपाच्यावतीने किल्ले स्पर्धेचे आयोजन
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23
°
C
23
°
23
°
53 %
2.6kmh
52 %
Thu
26
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

