Homeराजकियगोरगरिबांच्या रुग्णसेवेमुळेच माझा देशभर लौकिक : मंत्री हसन मुश्रीफ

गोरगरिबांच्या रुग्णसेवेमुळेच माझा देशभर लौकिक : मंत्री हसन मुश्रीफ

गोरगरिबांच्या रुग्णसेवेमुळेच माझा देशभर लौकिक : मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर :
गोरगरिबांच्या रुग्णसेवेमुळे माझा लौकिक संपूर्ण देशभर वाढला, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जीवात जीव असेपर्यंत अखेरच्या श्वासापर्यंत गोरगरिबांची रूग्णसेवा प्राणपणाने करीतच राहू, असेही ते म्हणाले. नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून पाठपुरावा करून मुंबईत मोफत उपचार झालेल्या रुग्णांच्या “शतायुषी व्हा…” या स्नेहमेळाव्यात मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. या मेळाव्याला गेल्या वर्षभरात उपचार झालेल्या अडीच हजारावर रुग्णांची उपस्थिती होती.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, तुमचे जीवन सुखी आणि समाधानी व्हावी हेच माझे अंतिम ध्येय आहे. जो पीडित आहे त्याच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर आहे. गोरगरीब रुग्णांवर महागडे उपचार करावयाचे झाल्यास त्यांना मरणाची वाट बघण्याशिवाय पर्याय नसायचा. त्यांच्याही जीवनात आनंद फुलवण्यासाठी सुधारित ट्रस्ट ॲक्ट करू शकलो. या कायद्यामुळे पुणे- मुंबईतील मोठमोठ्या दवाखान्यांमध्येही आज गोरगरीब रुग्णांना सन्मानाने मोफत उपचार मिळत आहेत. दीडशे कोटीहून अधिक निधीमधून सीपीआरचे संपूर्ण नूतनीकरण व नवीन आरोग्य सुविधा निर्माण होत आहेत. शेंडा पार्कमध्ये साकारत असलेल्या सुसज्ज व आद्ययावत आरोग्य सुविधांमुळे कोणतेही उपचारासाठी रुग्णांना पुणे मुंबईला जावे लागणार नाही.
पाडळी (ता. करवीर) येथील अमर पाटील यांनी आपल्या मुलाच्या उपचाराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमात हरी नाना खतकर (रा. नंद्याळ), चंद्रकांत दिनकर चौगुले (रा. कागल), भारती विनोद सुतार (रा. बटकणंगले), विनायक गाडगीळ (रा. पाचगाव), सौ. शुभ्रा मोहिते (रा. उंचगाव) या रुग्णांसह वजीर नायकवडी आदींची भाषणे झाली.
व्यासपीठावर गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील, गोकुळचे संचालक युवराज पाटील, बाजार समितीचे सभापती अध्यक्ष सूर्यकांत पाटील, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, रामगोंडा उर्फ तात्या पाटील, प्रकाशराव गाडेकर, नवल बोते, नवाज मुश्रीफ, मनोजभाऊ फराकटे, अमित गाताडे, नेताजीराव मोरे, प्रवीण काळबर, सौरभ पाटील, अमित पिष्टे, अर्जुन नाईक, विवेक लोटे आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील-कुरुकुलीकर यांनी केले. प्रास्ताविक विजय काळे यांनी केले. सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले. आभार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय चितारी यांनी मानले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
29 ° C
29 °
29 °
74 %
3.1kmh
20 %
Wed
29 °
Thu
32 °
Fri
28 °
Sat
27 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page