• कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ५२ गुणवंतांचा सत्कार
कोल्हापूर :
#ब्रँड_कोल्हापूर २०२५ सन्मान सोहळा शनिवारी कोल्हापूरचे सुपुत्र व नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल सयाजी येथे संपन्न झाला. यावेळी गेल्या वर्षभरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरचे नाव मोठे करणाऱ्या कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ५२ गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपुरकर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जेष्ठ टेबल टेनिसपटू शैलजा भोसले यांना ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच पॅरीस ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक विजेता स्वप्निल कुसाळे, साहित्यिक कृष्णात खोत, यूपीएससी परीक्षेतील गुणवंत बिरदेव डोणे यांच्यासह मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बाळ पाटणकर, श्रीराम पवार, रविंद्र ओबेरॉय, डॉ. बी. एम. हिर्डेकर, सुधाकर काशीद, अमरजा निंबाळकर, वृषाली पृथ्वीराज पाटील, देवश्री सतेज पाटील, डॉ. आर. एम. कुलकर्णी, रोटरीचे शीतल दुग्गे, निसर्गमित्रचे अनिल चौगले, पद्मा तिवले, अविनाश शिरगावकर, ब्रँड कोल्हापूर समितीचे सदस्य यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
——————————————————-
ब्रँड कोल्हापूर २०२५ सन्मान सोहळ्यात विविध मान्यवरांचा गौरव
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31
°
C
31
°
30.9
°
29 %
2.6kmh
0 %
Mon
31
°
Tue
28
°
Wed
29
°
Thu
28
°
Fri
27
°

