Homeशैक्षणिक - उद्योग एनआयटीमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

एनआयटीमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

कोल्हापूर :
उंचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या (आधीचे न्यू पॉलिटेक्निक) ऑटोमोबाईलच्या १९९१ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी काॅलेज परिसरात ५० देशी वृक्षांचे रोपण केले. यासाठी सुहास वायंगणकर व वृक्षमित्र मधुकर यवलुजे यांचा तज्ञ सल्ला घेतला.
काॅलेजच्या उत्कर्षासाठी माजी विद्यार्थी हातभार लावत आहेत, ही इथल्या शिक्षणाची खरी पोचपावती असल्याचे संचालक डॉ. संजय दाभोळे यांनी यावेळी नमुद केले. या उपक्रमासाठी ऑटोमोबाईल विभागप्रमुख प्रा. सुहासचंद्र देशमुख यांनी पुढाकार घेतला.
याप्रसंगी अधिष्ठाता प्रा. बाजीराव राजिगरे, प्रशासकीय अधिकारी संदीप पंडे, विभागप्रमुख, शिक्षक, कर्मचारी आणि सुरजितसिंग रजपूत, सुजित सूर्यवंशी, प्रशांत चव्हाण, बलराज निकम, रणधीर मोरे, आसिफ मोमीन, प्रदीप जगताप, उमेश परमेकर, महेश जामसांडेकर, अतुल संकपाळ, राजेश रांगोळकर, निलेश नार्वेकर, संतोष पाध्ये आदी माजी विद्यार्थी उपस्‍थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
27 ° C
27 °
27 °
61 %
0kmh
0 %
Sun
27 °
Mon
28 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page