कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित व टेक्नोमेट एंटरप्रायझेस पुरस्कृत कै. मुरलीधर सोमाणी ट्राॅफी १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत शाहूपूरी जिमखानाने पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळवला.
राजाराम काॅलेज मैदान येथे कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित व टेक्नोमेट एंटरप्रायझेस पुरस्कृत कै. मुरलीधर सोमाणी ट्राॅफी १९ वर्षाखालील दोनदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन टेक्नोमेट एंटरप्रायझेसच्या संचालिका योगीनी सोनी यांच्या हस्ते व राजेश सोमाणी, रीतेश सिंघी, शरयू सिंघी व माजी रणजी खेळाडू मिलींद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी असोसिएशनचे सचिव मदन शेळके, खजानिस शीतल भोसले, स्पर्धा कमिटी अध्यक्ष कॄष्णात धोत्रे, चेतन चौगुले, रमेश हजारे, राजेश केळवकर, डाॅ. संजय पाठारे, रोहन भुईंबर, साद मुजावर, ज्योती काटकर, मुद्दस्सर मुल्ला, दिवाकर पाटील, अनिल सागांवकर, पंच योगीता रेडेकर, मयुर ओझा व खेळाडू उपस्थित होते.
उदघाटनाचा सामना शाहूपूरी जिमखाना विरूध्द कै. मालती पाटील क्रिकेट ॲकॅडमी यांच्यात खेळविण्यात आला. या सामन्यात शाहूपुरी जिमखानाने पहिल्या डावाच्या अधिक्यावर विजय मिळविला. प्रथम फलदांजी करताना शाहूपुरी जिमखानाने पहिल्या डावात ८४.३ षटकांत सर्वबाद २९१ धावा केल्या. यामध्ये ज्ञानेश कवडे ६४, सुमेद्य देसाई ५३, समर्थ पटकुरे ४६, अंश येसणे ३०, कैफ जमादार २१ व वंश चव्हाण १७ धावा केल्या. कै. मालती पाटील क्रिकेट ॲकॅडमीकडुन पहिल्या डावात पॄथ्वीराज निंबाळकरने ३, ईशान देवणे, विराज सादोले व दिपक साळवी यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. कै. मालती पाटील क्रिकेट ॲकॅडमीने पहिल्या डावात ५२.५ षटकांत सर्वबाद १३३ धावा केल्या. यामध्ये अर्जुन घोरपडे ४५, ईशान देवणे २४, प्रज्वल पाटील १८, श्रेयश पाटील १४ धावा केल्या.
शाहूपुरी जिमखानाकडुन प्रितेश जाधवने ६, ज्ञानेश कवडेने २, अंश येसणे व समर्थ पटकुरे यांनी प्रत्येकी १ बळी घेतले. शाहूपुरी जिमखानाने पहिल्या डावात १५८ धावांची आघाडी घेतली. शाहूपचरी जिमखानाने दुसऱ्या डावात दिवस अखेर २९ षटकांत ६ बाद १२२ धावा केल्या. यामध्ये ज्ञानेश कवडे ३६, प्रितेश जाधव नाबाद ३०, वंशदिप ठोकळे १८, कैफ जमादार १३ धावा केल्या. कै. मालती पाटील क्रिकेट ॲकॅडमीकडुन दुसऱ्या डावात पॄथ्वीराज निंबाळकरने ६ बळी घेतले. अशाप्रकारे शाहूपुरी जिमखानाने पहिल्या डावाच्या अधिक्यावर विजय मिळविला.
——————————————————-
शाहूपुरी जिमखाना विजयी
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
27
°
C
27
°
25.9
°
41 %
4.1kmh
20 %
Sun
28
°
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

