Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा टाटा आयआयएसशी सामंजस्य करार

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा टाटा आयआयएसशी सामंजस्य करार

कोल्हापूर :
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक उद्योग क्षेत्रासाठी सक्षम करण्याच्या हेतूने टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स (आयआयएस), मुंबईसोबत सामंजस्य करार करण्यात आला. कौशल्य विकास आणि रोजगारक्षमतेला चालना देण्यासाठी व उद्योगाभिमुख प्रशिक्षणासाठी हा करार महत्वपूर्ण ठरणार आहे.
टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स, मुंबई आणि भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय यांच्या सहकार्याने स्थापन झालेल्या आयआयएसमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा व प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून प्रगत, उद्योगाभिमुख प्रशिक्षण दिले जाते. या करारामुळे डी. वाय. पाटील विद्यापीठातील विद्यार्थ्यांना नोकरीसाठी उपयुक्त विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ मिळणार असून त्यांच्या कौशल्यात व रोजगार संधींमध्ये वाढ होणार आहे.
याप्रसंगी टाटा आयआयएसचे वरिष्ठ सल्लागार एच. एन. श्रीनिवास (माजी प्रमुख मानव संसाधन – ताज हॉटेल्स), व्यवस्थापक राधे चौहान व सहाय्यक व्यवस्थापक डॉ. सचिन सावंत आदी उपस्थित होते. तर विद्यापीठाच्यावतीने कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, संचालक डॉ. अजित पाटील, सर्व अधिष्ठाता व विभागप्रमुख उपस्थित होते.
या करारासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31 ° C
31 °
30.9 °
29 %
2.6kmh
0 %
Mon
31 °
Tue
28 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
27 °

Most Popular

You cannot copy content of this page