कोल्हापूर :
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) च्यावतीने सन २०२४-२५ या फुटबॉल हंगामामध्ये महाराष्ट्र राज्य फुटबॉल संघासाठी प्रशिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय, विशेष कामगिरी समर्पण व क्रीडाशीलता यांची विशेष नोंद घेऊन विफा कोच ऑफ द ईयर (युवा- मुली) २०२४-२५ या पुरस्काराने प्रशिक्षक पृथ्वी गायकवाड यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख रुपये ५० हजार देऊन सन्मानित केले.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने प्रथमच पुरस्कार सुरू केलेले आहेत. पृथ्वी यांच्या फुटबॉल खेळाडू ते प्रशिक्षक या प्रवासाकरिता कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे पेट्रन इन चीफ खासदार श्री शाहू छत्रपती महाराज, अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, पेट्रन सौ. मधुरिमाराजे छत्रपती व पदाधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
प्रशिक्षक पृथ्वी गायकवाड यांनी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) साठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ३६व्या नॅशनल गेम्स, गुजरात २०२२ येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत वरिष्ठ महिला महाराष्ट्र राज्य महिला फुटबॅाल संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. तसेच जानेवारी २०२३ अखिल भारतीय फुटबॉल महासंघ १७ वर्षांखालील भारतीय महिला राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या (स्काउटस) निवडकर्ता म्हणून नेमणुक झाली होती. सप्टेंबर २०२३ मध्ये पंजाब येथे झालेल्या हिरो सब-ज्युनियर गर्ल्स राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धासाठी महाराष्ट्र राज्य संघाच्या संघ व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. जानेवारी २०२४ पालघर येथे झालेल्या ज्युनियर मुली आंतरजिल्हा फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य महिला फुटबॅाल संघाचा (स्काउटस) निवडकर्ता म्हणछन नेमणुक झाली होती. कर्नाटक- ॲागस्ट २०२४ मध्ये झालेल्या ज्युनियर गर्ल्स राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.
प्रशिक्षक पृथ्वी गायकवाड विफा कोच ऑफ द ईयरने सन्मानित
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
29
°
C
29
°
28.9
°
26 %
2.6kmh
0 %
Wed
29
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
27
°
Sun
28
°

