Homeकला - क्रीडामहाराष्ट्र महिला संघाच्या कर्णधारपदी अनुजा पाटील

महाराष्ट्र महिला संघाच्या कर्णधारपदी अनुजा पाटील

• शिवाली शिंदेची महाराष्ट्र महिला सिनियर टी-२० संघात निवड
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (केडीसीए)च्या महिला क्रिकेट खेळाडू अनुजा पाटीलची महाराष्ट्र महिला संघाच्या कर्णधारपदी तर शिवाली शिंदेंची बीसीसीआय मार्फत घेतल्या जाणाऱ्या टी-२० स्पर्धेसाठी महाराष्ट्र महिला सिनियर टी-२० संघात निवड झाली आहे.
स्पर्धा ८ ते १९ ऑक्टोबर २०२५ पर्यंत नागपूर येथे होणार आहे. ही स्पर्धा टी-२० साखळी पध्दतीची असून महाराष्ट्र महिला संघ ईलीट ब ग्रुप मध्ये आहे. या ग्रुप मध्ये तामिळनाडू, मध्यप्रदेश, पांडेडेचरी व राजस्थान महिला संघाचा समावेश आहे. महाराष्ट्राचा पहिला सामना दि. ८ ऑक्टोबर रोजी तामिळनाडू संघाबरोबर, दुसरा सामना दि ९ ऑक्टोबर रोजी मध्यप्रदेश बरोबर तर तिसरा सामना दि. ११ ऑक्टोबरला पांडेचरी बरोबर, चौथा सामना दि.१३ ऑक्टोबरला राजस्थान संघाबरोबर होणार आहे. महाराष्ट्र महिला संघ रविवारी पुण्यातून नागपूरकडे रवाना होणार आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
29 ° C
29 °
28.9 °
26 %
2.6kmh
0 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
27 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page