Homeसामाजिकरमाई नर्सिंग कॉलेज आरोग्यसेवेची नवी दिशा ठरेल : भूषण पाटील

रमाई नर्सिंग कॉलेज आरोग्यसेवेची नवी दिशा ठरेल : भूषण पाटील

कोल्हापूर :
कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे रमाई ऑन्कोलॉजी नर्सिंग कॉलेज राज्याच्या आरोग्य सेवेची नवी दिशा ठरेल, असे प्रतिपादन बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक भूषण पाटील यांनी केले. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने छत्रपती शाहू कॅन्सर सेंटर रिसर्च फाऊंडेशन येथे सुरू झालेल्या रमाई ऑन्कोलॉजी नर्सिंग कॉलेजच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्य डॉ. उमरानी जे म्हणाल्या, राज्यातील कॅन्सरविरोधी मोहिमेला यामुळे नवे बळ मिळणार आहे. हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या धोरणांतर्गत तसेच डीएमईआर आणि एमएसबीएनपीईच्या मान्यतेने राबविण्यात आला आहे. कॅन्सर नर्सिंग प्रशिक्षण क्षेत्रात टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई अग्रणी राहिले आहे. नंतर महाराष्ट्रातील दुसरे अधिकृत प्रशिक्षण केंद्र म्हणून रमाई ऑन्कोलॉजी नर्सिंग कॉलेज उदयास आले आहे. ही कोल्हापूरसाठी अभिमानाची बाब आहे.
डॉ. सूरज पवार म्हणाले की, हा अभ्यासक्रम शासकीय तसेच खासगी क्षेत्रात कार्यरत नर्सेससाठी एक सुवर्णसंधी आहे. शासकीय रुग्णालयातील नर्सेसना कॅन्सर उपचारातील तांत्रिक कौशल्य मिळेल. खासगी रुग्णालयातील नर्सेसना व्यावसायिक दर्जाचे प्रशिक्षण मिळून त्यांच्या सेवेला आंतरराष्ट्रीय मानांकनचा दर्जा येईल. ग्रामीण भागातील नर्सेसदेखील या प्रशिक्षणामुळे कॅन्सर रुग्णसेवेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतील. रुग्णांना मानसिक व भावनिक आधार देतील.
डॉ. रेश्मा पवार म्हणाल्या की, या कॉलेजच्या स्थापनेमुळे महाराष्ट्राच्या कॅन्सरविरोधी मोहिमेला एक सक्षम आधार मिळणार आहे. प्रशिक्षित नर्सिंग मनुष्यबळामुळे ग्रामीण व शहरी भागातील आरोग्यसेवा उंचावेल. कॅन्सर उपचाराचा दर्जा सुधारेल. समाजात कॅन्सरविषयी जागरूकता निर्माण होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्ण व कुटुंबीयांना नवी आशा मिळेल. रमाई ऑन्कोलॉजी नर्सिंग कॉलेज केवळ नर्सिंग प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता भविष्यात संशोधन, शैक्षणिक उपक्रम आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यामध्येही आपले स्थान निर्माण करेल.
याप्रसंगी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर. एम. कुलकर्णी, डॉ. संदीप पाटील उपस्थित होते. प्राचार्य नागेश गुंडप यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
28 ° C
28 °
28 °
47 %
0kmh
20 %
Thu
27 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
26 °
Mon
27 °

Most Popular

You cannot copy content of this page