Homeशैक्षणिक - उद्योग कोल्हापूरात पीएनजी ज्वेलर्सच्या नवीन दालनाचा शुभारंभ

कोल्हापूरात पीएनजी ज्वेलर्सच्या नवीन दालनाचा शुभारंभ

कोल्हापूर :
१९३ वर्षांची परंपरा असलेल्या सुव्यवस्थित कौटुंबिक दागिन्यांच्या ब्रँडपैकी एक, पी.एन.जी ज्वेलर्सने कोल्हापुरात आपले पहिले दालन नवरात्राच्या शुभमुहूर्तावर सुरू केले. महाराष्ट्रातील विस्तार प्रवासातील ही एक महत्त्वपूर्ण पायरी आहे.
या उदघाटन सोहळ्यादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन म्हणाल्या की, कोल्हापूरची संस्कृती आणि परंपरा खूप खोलवर रुजलेली आहे. पीएनजी ज्वेलर्स या परंपरेला उत्तम दागिन्यांमधून आधुनिकता व सौंदर्याची जोड देईल. वारसा आणि आधुनिक कारागिरीचा संगम असलेल्या या क्षणाचा भाग होण्याची संधी मला मिळाली याचा आनंद आहे.
नवीन दालन स्टेशन रोड येथे सुरू झाले असून, या दालनात सोने, हिरे, चांदी व प्लॅटिनमचे दागिने उपलब्ध आहेत. ‘प्रथा’, ‘कथा’, ‘ईना’, आणि ‘सप्तम’ यांसारख्या पारंपरिक वधू संग्रहांपासून ते आधुनिक हलक्या वजनाच्या डिझाईन्सपर्यंत, पीएनजी ज्वेलर्सने परंपरा, शुद्धता आणि नाविन्याचा सुंदर संगम राखला आहे.
नवरात्राच्या या शुभप्रसंगी ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांवरील मेकिंग चार्जेसवर ५०% पर्यंत सवलत आणि हिऱ्याच्या दागिन्यांवरील मेकिंग चार्जेसवर १००% पर्यंत सवलत आणि जुन्या सोन्याच्या एक्स्चेंजवर ०% कपातीचा लाभ कोल्हापूरकरांना मिळणार आहे.
पी.एन.जी. ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी सांगितले की, कोल्हापूर आमच्या हृदयात नेहमीच जवळचं राहिलं आहे. नवरात्रासारख्या शुभप्रसंगी आमचे पहिले दालन येथे सुरू करणे आमच्यासाठी खूपच खास आहे. कोल्हापूर हे एक सांस्कृतिक शक्तीपीठासोबतच समृद्धी व प्रगतीचं प्रतीक आहे. या दालनाच्या माध्यमातून आम्ही कोल्हापूरकरांपर्यंत पी.एन.जी. ज्वेलर्सची विश्वासार्हता व कारागिरी पोहचवू इच्छितो.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30 ° C
30 °
27.9 °
42 %
3.1kmh
20 %
Thu
28 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
26 °
Mon
27 °

Most Popular

You cannot copy content of this page