कोल्हापूर :
कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए)ची ८५वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी केएसए येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत विविध खेळातील खेळाडू व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
केएसएचे अध्यक्ष श्री. मालोजीराजे छत्रपती यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या फोटोचे पूजन केल्यानंतर पुढील कामकाज सुरू झाले. केएसएचे जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांनी उपस्थित पेट्रन मेबर्स, व्हा.प्रेसिडेंटस्, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, कार्यकारिणी मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य आणि सभासद यांचे स्वागत केले. त्यांनी प्रास्ताविकमध्ये संस्थेच्या फुटबॉल खेळांच्या स्पर्धा व विविध ॲक्टिव्हिटीज यांची तसेच लॉन टेनिस, क्रिकेट, जिम्नॅस्टिक्स, टेबल टेनिस इत्यादी विभागातील झालेल्या स्पर्धांचा व खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा व संस्थेच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
यानंतर जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांनी सभेचे कामकाज सुरू केले. यावेळी अहवाल सालातील दिवंगत झालेले देशातील थोर व्यक्ती, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले भारतीय पर्यटक, भारत मातेसाठी शहीद झालेल्या जवानांना तसेच संस्थेचे लाईफ मेंबर, नामवंत खेळाडू, हितचिंतक, ज्ञात-अज्ञात व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष श्री. मालोजीराजे छत्रपती यांची एशियन फुटबॉल कॉन्फिडरेशन डेव्हल्पमेंट कमिटी मेंबरपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार अरूण नरके यांच्या हस्ते करण्यात आला. खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांनी कोल्हापूरामध्ये सुरू झालेल्या हायकोर्टचे सर्किट बेंचसाठी विशेष प्रयत्न केलेत, अंतराळवीर शुभांशू शुक्ला एक्सीओम मिशन ४ नासाच्या संयुक्त मोहिमेत पायलट म्हणून सहभागी, वुमन्स चेस वर्ल्ड कप विजेत्या बुद्धीबळपटू दिव्या देशमुख व क्रीडाक्षेत्रातील विविध मान्यवरांसह खेळाडूंचे अभिनंदन करून मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या नांवांचे वाचन राजेंद्र दळवी यांनी केले.
यानंतर संस्थेचा वार्षिक अहवाल, ऑडिटर्स रिपोर्ट, ताळेबंद व नफा-तोटा पत्रक, अंदाजपत्रक २०२५-२६ यांना मंजुरी देण्यात येऊन संस्थेचे व्हाईस प्रेसिडेंटस् म्हणून अरूण नरके, मानसिंग जाधव व मारूती उर्फ बाळ निचिते यांची निवड करण्यात आली. संस्थेचे ऑडिटर म्हणून अमोल पवार यांची नेमणूक करण्यात आली.
ऑन.जाँईट जनरल सेक्रेटरी प्रा. अमर सासने यांनी अध्यक्ष श्री. मालोजीराजे छत्रपती, सौ. मधुरिमाराजे छत्रपती व उपाध्यक्ष, गव्हर्निंग कौन्सिल मेंबर, उपस्थित सभासदांचे, अहवाल वर्षात संपन्न झालेल्या संस्थेच्या विविध स्पोर्टस् ॲक्टिव्हिटीज्साठी केएसए कार्यकारिणी समितीच्यावतीने नेमण्यात आलेल्या सर्व सब कमिटीच्या सदस्यांनी उत्तमरितीने केलेल्या सहकार्याबद्दल, विविध मान्यवर व्यक्तींनी, संस्थांनी संस्थेतील विविध स्पोर्टस् ॲक्टिव्हिटीज्साठी अनुदान व देणगी देऊन केलेल्या सहकार्याबद्दल, संस्थेचे सर्व सभासद, संघ, खेळाडू, पंच यांनी वेळोवेळी संस्थेला केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
केएसएच्या सर्वसाधारण सभेत विविध खेळातील खेळाडू व मान्यवरांचा सत्कार
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30
°
C
30
°
27.9
°
42 %
3.1kmh
20 %
Thu
28
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

