Homeशैक्षणिक - उद्योग संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्रातील नंबर वन स्कूल

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्रातील नंबर वन स्कूल

कोल्हापूर :
मुंबई येेथे नुकत्याच पार पडलेल्या शैक्षणिक कार्यक्रमात अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला डे कम बोर्डिंग विभागात महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा सन्मान प्राप्त झाला. हा सन्मान संजय घोडावत शिक्षण संकुलाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी स्वीकारला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आय. बी स्कुल, डेव्हलपमेंट असोसिएट मॅनेजर शशिकांत विश्वकर्मा, अकॅडमिक इंटरनॅशनल स्टडीस संचालक सुरेन रामसुब्बू व एज्युकेशन टुडेचे फाउंडर अँड मॅनेजिंग डायरेक्टर अनिल शर्मा उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या शाळांना ‘एज्युकेशन टुडे’ या संस्थेमार्फत पुरस्कार देण्यात आले.
याप्रसंगी बोलताना श्रीमती सस्मिता मोहंती म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळेच हा पुरस्कार मिळाला आहे. अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, नवोपक्रम, उत्कृष्ट निकाल, आणि शिक्षकांचे समर्पण, प्रायोगिक शिक्षणपद्धती, उच्च शिक्षित शिक्षक, जागतिक दर्जाचे शिक्षण या सर्व गोष्टींमुळे आम्ही हे यश प्राप्त करू शकलो.
चेअरमन संजय घोडावत आणि विश्वस्त विनायक भोसले यांनी श्रीमती मोहंती यांच्या शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ. एच. एम. नवीन, डे बोर्डिंग स्कूलचे प्राचार्य अस्कर अली, ज्यु कॉलेजचे प्राचार्य नितेश नाडे, शिक्षकवर्ग, विद्यार्थी आणि पालकांचेही त्यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24 ° C
24 °
24 °
46 %
2.1kmh
0 %
Tue
29 °
Wed
28 °
Thu
29 °
Fri
28 °
Sat
26 °

Most Popular

You cannot copy content of this page