Homeसामाजिककेएमटी 'श्री दुर्गादर्शन' विशेष बस सेवेचा शुभारंभ

केएमटी ‘श्री दुर्गादर्शन’ विशेष बस सेवेचा शुभारंभ

कोल्हापूर :
के.एम.टी. उपक्रमामार्फत शारदीय नवरात्रौत्सवाचे कालावधीत भाविक प्रवाशांच्या सोईसाठी सुरु करण्यात आलेल्या ‘श्री दुर्गादर्शन’ विशेष बस सेवेचा शुभारंभ सोमवारी श्री शाहू मैदान वाहतूक नियंत्रण केंद्र येथे कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते तसेच उपायुक्त परितोष कंकाळ व सहा.आयुक्त तथा अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी नियमित दुर्गादर्शन बस सेवेच्या प्रवाशांच्या हस्ते बसचे पुजन करण्यात आले. यावर्षी ‘श्री दुर्गादर्शन’ विशेष बस सेवेसाठी परिवहन उपक्रमाकडून वातानुकुलीत बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
या कार्यक्रमास वाहतूक निरीक्षक नितीन पोवार, दुर्गादर्शन बस सेवा प्रमुख सुनिल पाटील, स्थानक प्रमुख संग्रामसिंह काशिद, वर्क्स मॅनेजर दीपक पाटील, प्रकल्प अधिकारी पी. एन. गुरव, माजी वाहतूक निरीक्षक रवी धुपकर, सुनिल जाधव, महापालिका मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील, लेखापाल राजू सूर्यवंशी, जनसंपर्क अधिकारी संजय इनामदार, कसुरी विभाग प्रमुख प्रदिप म्हेतर, दिनेश सोमण, हेमंत हेडाऊ, सागर वंजारे, विवेक साठे, केएमटी वाहतूक विभागाकडील चालक-वाहक कर्मचारी तसेच वर्कशॉप विभागाकडील कर्मचारी व अधिकारी तसेच भाविक प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेविका सौ. स्मिता माने, माझी शाळा सुसंस्कार हायस्कूल कदमवाडीचे शिक्षक सागर पाटील यांचा सत्कार के. मंजूलक्ष्मी यांचे हस्ते करण्यात आला.
या बससेवेसाठी आगाऊ आरक्षण आणि इतर माहितीसाठी केएमटीच्या श्री शाहू मैदान पास नियंत्रण केंद्र येथे स्वतंत्र माहिती कक्ष सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत उघडण्यात आला आहे. दि.२२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरअखेर सकाळी ९, १०, ११, १२, दुपारी १ या वेळेला एसी बसेस सुटतील. याचा तिकीट दर प्रौढास रु.१८

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
28 ° C
28 °
26.9 °
51 %
3.6kmh
20 %
Thu
27 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
26 °
Mon
27 °

Most Popular

You cannot copy content of this page