Homeराजकियपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

कोल्हापूर :
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी कोल्हापूर च्यावतीने गंगावेश चौक आणि शाहू उद्यान या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी स्वच्छता अभियानात उत्साहाने सहभाग नोंदवला. गंगावेश चौक परिसर व शाहू उद्यानमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्याची प्रार्थना केली. देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.  या कार्यक्रमामध्ये प्लॅस्टिक मुक्तीची शपथ भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव यांनी उपस्थितांना दिली.
भाजपा जिल्हा कार्यालयात भाजपा पदाधिकाऱ्यांसाठी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये १७५ पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरास खासदार धनंजय महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, आमदार अमल महाडिक यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.
या कार्यक्रमांचे भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक म्हणून भरत काळे, गिरीश साळोखे, रविकिरण गवळी, राजू मोरे, सुनील पाटील यांनी काम पाहिले. याप्रसंगी विराज चिखलीकर, अमर साठे, राजू मोरे, धनश्री तोडकर, माधुरी नकाते, हेमंत आराध्ये, शैलेश पाटील, गायत्री राऊत, विशाल शिराळकर, धीरज पाटील, राजसिंह शेळके, विजय अग्रवाल, अतुल चव्हाण, संगीता खाडे, सोमन गवळी, अमेय भालकर, महेश यादव, दिलीप बोंद्रे, विशाल शिराळे, किशोर लाड, सचिन सुतार, संतोष भिवटे, गिरीश साळोखे, डॉ. राजवर्धन, प्रताप देसाई, सयाजी आळवेकर, अनिल कामत, अनिकेत अतिग्रे, दिग्विजय कालेकर, श्रीकांत रांगोळे, विश्वजित पोवार, सचिन कुलकर्णी, जयराज निंबाळकर, कोमल देसाई, प्रीतम यादव, तेजस्विनी पार्टे, अश्विनी गोपुडगे, विनय खोपडे, राजगणेश पोळ, शामली भाकरे, माधुरी कुलकर्णी, अप्पा लाड, राजेश कोगनूळकर, मानसिंग पाटील, राहुल घाटगे, प्रकाश कालेकर, अमोल पालोजी, अलका जावीर, संग्राम जरग, सचिन पोवार, संजय जासूद, सुधीर देसाई, किसनराव खोत, योगेश ओटावकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31 ° C
31 °
28.9 °
42 %
4.6kmh
5 %
Thu
29 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
26 °
Mon
27 °

Most Popular

You cannot copy content of this page