कोल्हापूर :
राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची नवी दिल्लीत भेट घेतली. भारत देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल खा. महाडिक यांनी, त्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
अल्पावधीतच सी. पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून ठळक कामगिरी केली होती. त्यानंतर त्यांना थेट एनडीए सरकारकडून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उतरवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीएमधील सर्वच घटक पक्षांच्या पाठिंब्यामुळे, सी. पी. राधाकृष्णन भारताचे उपराष्ट्रपती बनले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत देशहिताची अनेक कामे मार्गी लागतील, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.
——————————————————-
उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचे खा.महाडिक यांच्याकडून अभिनंदन
Mumbai
mist
26
°
C
26
°
25.9
°
89 %
1.5kmh
75 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°