Homeराजकियराष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत राज्य सरकारच्या पातळीवर पाठपुरावा करू : आ....

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत राज्य सरकारच्या पातळीवर पाठपुरावा करू : आ. सतेज पाटील

कोल्हापूर :
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत राज्य सरकारच्या पातळीवर पाठपुरावा करू, अशी ग्वाही विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी त्यांनी बुधवारी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिल्यानंतर सायंकाळी, हे आंदोलन मागे घेण्यात आले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या राज्यातील हजारो अधिकारी आणि कर्मचारी नियमित शासन सेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी १९ ऑगस्ट २०२५ पासून राज्यभर बेमुदत आंदोलन करत होते. या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारी सक्रीय सहभागी होत
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात केली होती.
आंदोलनाचा आज १६वा दिवस होता. याशिवाय या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत प्रशासनान नोटीस बजावल्या होत्या. मात्र जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला होता. त्यामुळे आरोग्य सेवेवरही त्याचा परिणाम झाला होता. त्यामुळे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या आंदोलनाच्या ठिकाणी बुधवारी सकाळी भेट दिली. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत आमदार सतेज पाटील यांनी सविस्तर चर्चा केली. याशिवाय मागण्याबाबत सरकार पातळीवर पाठपुरावा करण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.
दरम्यान, राष्ट्रीय आरोग्य अभियान
कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संघटनेची दि. ९ सप्टेंबर रोजी मंत्रालयात बैठक झाली होती. या बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या, मान्य करण्याच आश्वासन देण्यात आले होते. याशिवाय मागण्याबाबत एक समिती गठीत करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांनी त्यांचे बेमुदत आंदोलन आज सायंकाळी मागे घेतले.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31 ° C
31 °
30.9 °
29 %
2.6kmh
0 %
Mon
31 °
Tue
28 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
27 °

Most Popular

You cannot copy content of this page