• इंग्लिश मीडियम स्कूल्स असोसिएशनतर्फे शिक्षकांच्या कार्याचा गौरव
कोल्हापूर :
शासकीय शाळांमधील शिक्षकांबरोबरच इंग्रजी माध्यमांच्या शाळातील शिक्षकही मुलांना शिकवत असतात. शिक्षक हा मुलांना घडवत असतो. मात्र अलीकडे गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्यासाठी गुणवत्ता असणाऱ्या शाळांकडे पालकांचा कल वाढलेला आहे, त्यामुळे शिक्षकांची आणि शाळांचीही जबाबदारी वाढलेली आहे. यात चांगली पिढी घडविण्यासाठी शिक्षकांचा वाटा महत्त्वाचा असणार असून मुलांना चांगले शिक्षण देणेही शिक्षकांची जबाबदारी असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी उद्गार काढले.
शिक्षकदिनाचे औचित्य साधून इंग्लिश मीडियम स्कूल्स असोसिएशन कोल्हापूरतर्फे मुख्याध्यापक शिक्षक यांचा सत्कार सोहळा हॉटेल सयाजी येथे पार पडला. याप्रसंगी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ. सुवर्णा सावंत, इंग्लिश मिडीयम स्कूल्स असोसिएशनचे राज्य सचिव प्रभाकर हेरवाडे यांनी आपले विचार मांडले.
यावेळी इंग्लिश मीडियम स्कूल्स असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष गणेश नायकुडे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष के. डी. पाटील, शहराध्यक्ष अमर सरनाईक, सचिव नितीन पाटील, मुख्य समन्वयक सुहेल बाणदार, मोहन माने, एन. एन. काझी, विल्सन वास्कर, दत्तात्रय रणदिवे, संजय जाधव, सागर माने, प्रकाश पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते. यावेळी स्वागत के. डी. पाटील यांनी केले. संस्थापक अध्यक्ष महेश पोळ यांनी प्रास्ताविक तर सचिन नाईक यांनी आभार मानले.
गौरव झालेले शिक्षक असे…
मुख्याध्यापकमध्ये शकुंतला कृष्णा पाटील, लक्ष्मी गणेश, स्वप्नील संदीप पाटील, भाग्यश्री सुरज मगदूम, रूपा राजेश पाष्टे, निले रीमा महेश, राजश्री युवराज पाटील आदी तर शिक्षकांमध्ये कृपाल रामचंद्र यादव, सविता भीमराव काटकर, सुगंधा कपिल माळकरी, आरती राकेश दुर्गुळे, मीना प्रताप डाके, मधुरा मकरंद देशपांडे, अश्विनी प्रशांत सादळे, स्नेहलता जनगोंडा घाट, सुप्रिया प्रकाश किरवेकर, अनुराधा सुधीर कुकडे, सुमय्या इरफान बागवान, अश्विनी रामचंद्र पाटील, वर्षा पी. कोतेकर, अपर्णा दिलीप मुंगार्डेकर, माहेश्वरी बाबासो पाटील, नेहा उल्हास खानाज, आशाराणी बबनराव भंडारी, सुभाष जयराम कांबळे, रूपाली संजय पाटील, मेघा विष्णू पाटील अरिफा सुलेमान फरास, गौसिया साजिद नवाब, धनश्री अरविंद जाधव, प्रियांका सागर गुरव, तृप्ती विजय गोंधळी, मंजू संजय जालिंदरे, विशाखा अनिल खाडे, अबोली सागर देशपांडे, मनाली अनुप गणपते, राजाराम भाऊ पाटील, पद्मजा विकास भोसले, किशोर बाळासाहेब मानकापुरे, रियाज अब्दुल शेख, ज्ञानेश्वरी अमितकुमार स्वामी आदी शिक्षकांना गौरविण्यात आले.
——————————————————-
नवी पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची : पालकमंत्री
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
27.6
°
C
27.6
°
27.6
°
69 %
1.2kmh
8 %
Tue
27
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
27
°