Homeशैक्षणिक - उद्योग प्रामाणिक प्रयत्नच ध्येयापर्यंत पोहोचवितात : प्रा. डॉ. राशिनकर

प्रामाणिक प्रयत्नच ध्येयापर्यंत पोहोचवितात : प्रा. डॉ. राशिनकर

कोल्हापूर :
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्यास त्याला ते यशापर्यंत पोहोचवितात असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक व बौद्धिक संपदा हक्क कक्षाचे संचालक प्रा. डॉ. गजानन राशिनकर यांनी केले. येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाच्या पदव्युत्तर समन्वय समितीच्यावतीने आयोजित केलेल्या एकदिवसीय नेटसेट मार्गदर्शन कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. याप्रसंगी उदघाटक व प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी, शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. दत्तप्रसाद पोरे, उपप्राचार्य प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे यांची उपस्थिती होती.
डॉ. राशिनकर पुढे म्हणाले, नेट किंवा सेट या परीक्षा अत्यंत सोप्या असून विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास त्यांना यश प्राप्त करता येते. आपण ज्या विषयाची परीक्षा देणार असतो त्या विषयाचा आवाका मोठा असल्याने पेपर क्रमांक एकची अधिक चांगली तयारी केल्यास पास होण्याची अधिक संधी असते. स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना अभ्यासाबरोबरच युक्त्या प्रयुक्त्यांचा अधिक वापर करावा. आपल्याकडे जिद्द असेल तर आपण चिकाटीने व मेहनतीने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो. यावेळी त्यांनी नेट सेट पेपर क्रमांक एकच्या नोट्स विद्यार्थ्यांना मोफत दिल्या.
उदघाटनपर भाषण करताना डॉ. चौधरी म्हणाले, प्राध्यापक होण्यासाठी नेट किंवा सेट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असून परिश्रमाने व योग्य नियोजनाने ही परीक्षा पास होता येते. मुलाखत देताना विषयाच्या ज्ञानाबरोबर सामान्य ज्ञानही आवश्यक असते. शासनाच्या बदलत्या धोरणानुसार आपली शैक्षणिक पात्रता सिद्ध करणे गरजेचे आहे.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी डॉ. राशिनकर यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. यशाला कोणताही शॉर्टकट नसून अधिक मेहनत करून यश संपादन केले पाहिजे असे प्रतिपादन केले.
प्रास्ताविक संदीप पातुगडे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे यांनी करून दिला. सूत्रसंचालन श्रीमती रेश्माबानो मुलांनी व श्रीमती सुमती कांबळे यांनी केले. आभार डॉ. राजेश गावित यांनी मानले.
प्रथम सत्रात डॉ. राशीनकर यांनी प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांना अनेक संकल्पना स्पष्ट करून सांगितल्या. प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले तर आभार डॉ. संदीप वाटेगावकर यांनी मानले.
द्वितीय सत्रामध्ये विषयतज्ञ म्हणून प्रा. डॉ. दत्तप्रसाद पोरे (रसायनशास्त्र), डॉ. संजय कुमार सरगडे (मराठी), डॉ. सिराज शेख (हिंदी), डॉ. सारंगपानी शिंदे (इंग्रजी), डॉ. नेताजी दबडे (वाणिज्य), प्रा. मनीषा पवार (अर्थशास्त्र) यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला पदव्युत्तर वर्गातील १५३ विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सर्व पदव्युत्तर विभाग प्रमुख व नेट सेट मार्गदर्शन समितीच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
25 ° C
25 °
25 °
41 %
2.1kmh
20 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
26 °
Sun
27 °

Most Popular

You cannot copy content of this page