• राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील – आसुर्लेकर यांचे आवाहन
कोल्हापूर :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सोमवारी (दि.२५) कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील – आसुर्लेकर यांनी केले. राहुल पाटील व राजेश पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात ही बैठक झाली.
यावेळी बोलताना श्री. आसुर्लेकर पाटील पुढे म्हणाले, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राहुल पाटील व राजेश पाटील या बंधूंसह कै. पी. एन. पाटील गटाच्या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद निश्चितच वाढणार आहे. आगामी केडीसीसी बँक, गोकुळ दूध संघ, शेतकरी सहकारी संघ, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तसेच; ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पक्षाला फार मोठे पाठबळ मिळणार आहे.
ते पुढे म्हणाले, राहुल पाटील व राजेश पाटील या बंधुंसह कै. पी. एन. पाटील गटाच्या सर्वच कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सन्मानाची वागणूक मिळेल. पक्षाकडून जुना नवा असा भेद न करता आम्ही सर्वजण एकदिलाने काम करू.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे, महिला जिल्हाध्यक्ष सौ. शितल फराकटे, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप माने, बाजार समितीचे उपाध्यक्ष राजाराम चव्हाण, इचलकरंजी शहराध्यक्ष सुहास जांभळे, अमित गाताडे, पंडितराव केणे, मधुकर जांभळे, संभाजीराव पवार, संतोष धुमाळ, शिवाजीराव देसाई, प्रमोद पवार, पूजा साळुंखे, निहाल कलावंत, संभाजीराव पाटील, विनय पाटील, विकास पाटील आदी उपस्थित होते.
स्वागत राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा युवक अध्यक्ष नितीन दिंडे यांनी केले. प्रास्ताविक प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी केले. आभार विश्वनाथ कुंभार यांनी मानले.
——————————————————-
अजितदादांच्या दौऱ्यावेळी सोमवारी मोठ्या संख्येने उपस्थित रहा
Mumbai
overcast clouds
26
°
C
26
°
26
°
89 %
5.8kmh
100 %
Sat
27
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
27
°