कोल्हापूर :
सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्यावतीने दिला जाणारा उद्योगरत्न पुरस्कार यावर्षी मौर्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मंगेश पाटील यांना देण्यात येणार आहे. ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक अशोक दुगाडे यांच्या हस्ते आणि पितांबरीचे सर्वेसर्वा रवींद्र प्रभुदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत, शनिवारी (दि.२३) पुरस्कार प्रदान केला जाईल. याच बरोबर बेस्ट सॅटर्डे क्लब मेंबर पुरस्कार देखील वितरित करण्यात येईल, अशी माहिती रिजन हेड कोल्हापूर वेस्ट रिजन योगेश देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, कोल्हापूरच्या मातीमध्ये आजवर अनेक उद्योजक घडले. यामध्ये अनेकांनी कोल्हापूरचे नाव जागतिक पातळीवर नेऊन ठेवले. अशाच उद्योजकांना सॅटर्डे क्लबतर्फे दरवर्षी गौरविण्यात येते. उद्योजक, व्यापारी आणि स्टार्टअप्स यांच्या वाढीसाठी कार्यरत असलेल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट, कोल्हापूर तर्फे २३ ऑगस्टला दुपारी ३ वाजता उद्योगपती मंगेश पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह,शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात येईल. हा कार्यक्रम हॉटेल फर्न, मार्केट यार्ड समोर, कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे.
हा सोहळा सॅटर्डे क्लबचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि ट्रस्टी अशोक दुगाडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई, सॅटर्डे क्लब जनरल सेक्रेटरी सुहास फडणीस, केदार साखरे, योगेश देशपांडे, सौ. दिपा देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.
कोल्हापूर चाप्टरतर्फे दिल्या जाणाऱ्या उद्योगरत्न या पुरस्काराचे हे नववे वर्ष आहे. पहिला उद्योगरत्न पुरस्कार उद्योगपती कै. राम मेनन आणि कै. राम प्रताप झंवर यांना प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर घाटगे पाटील इंडस्ट्रीजचे किरण पाटील, साउंड कास्टिंग प्रायव्हेट लि.चे व्ही. एन. देशपांडे, रॉकेट इंजिनीरिंगचे बाबाभाई वसा, श्री गुरुदत्त शुगर्सचे माधवराव घाटगे, मयुरा स्टील्स प्रायव्हेट लिमिटेडचे चंद्रशेखर डोली, चकोते फुड्सचे अण्णासाहेब चकोते आणि मार्व्हलस ग्रुपचे संग्राम पाटील यांना उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदला अमेय गोडे, दीपा देशपांडे, इंद्रनील बंकापुरे, सुदर्शन म्हाकवे, आनंद साळुंखे व रोहन शेटे उपस्थित होते.
मंगेश पाटील यांना सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा उद्योगरत्न पुरस्कार जाहीर
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26.1
°
C
26.1
°
26.1
°
88 %
5kmh
100 %
Sat
27
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
27
°