Homeराजकियसद्भावना दौडच्या माध्यमातून राजीव गांधी यांना अभिवादन

सद्भावना दौडच्या माध्यमातून राजीव गांधी यांना अभिवादन

ोल्हापूर :
भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त, कोल्हापूर काँग्रेसच्यावतीने बुधवारी सद्भावना दौड काढण्यात आली. या दौडच्या माध्यमातून स्वर्गीय राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून या सद्भावना दोडची राजर्षी शाहू समाधी स्थळापासून सुरुवात करण्यात आली.
‘अमर रहे अमर रहे, राजीव गांधी अमर रहे’ अशा घोषणा देत कोल्हापुरात सद्भावना दौड संपन्न झाली. भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ८१व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने या सद्भावना दौडचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली या सद्भावना दौडचे आयोजन करण्यात येते होते. यंदा काँग्रेसच्यावतीने या दौंडचे आयोजन करण्यात आले होते.
माजी आ. ऋतुराज पाटील यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाजवळ अभिवादन करुन ज्योत प्रज्वलित करण्यात आली. यानंतर सीपीआर चौक – दसरा चौक – व्हीनस – कॉर्नर – दाभोळकर कॉर्नर – वटेश्वर महादेव मंदिर आणि मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील राजीव गांधी पुतळ्यापर्यंत ही सद्भावना दौड काढण्यात आली.
माजी आ. ऋतुराज पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजेश लाटकर यांच्यासह उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून राजीव गांधी यांच्या पुतळ्याला या ठिकाणी अभिवादन केल. पी. एन. पाटील यांचे विचार हे काँग्रेसचे विचार आहेत आणि त्यांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सद्भावना दौडचे आयोजन केले आहे. या सदभावना दौडचे दरवर्षी आयोजन करण्यात येईल, यामध्ये काँग्रेसच्यावतीने सातत्य राखण्यात येईल. असेही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी सांगितले.
या सद्भावना दौड मध्ये आनंद माने, सुर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, सरलाताई पाटील, बाळासाहेब सरनाईक, संजय मोहिते, बबन रानगे, दत्ता वारके, श्रीराम सोसायटीचे सभापती संतोष पाटील, मधुकर रामाणे, दुर्वास कदम, विक्रम जरग, अर्जुन माने, राहुल माने, प्रविण केसरकर, ईश्वर परमार, रियाज सुभेदार, प्रताप जाधव सरकार, रवि आवळे, जय पटकारे, विनायक फाळके, फिरोज सौदागर धनंजय सावंत, सुभाष बुचडे, तौफीक मुल्लाणी, मोहन सालपे, सुरेश ढोणुक्षे, शशिकांत पाटील, अमर समर्थ, दता बामणे, रमेश चावरे, अनुप पाटील, दिग्विजय मगदूम, सर्जेराव साळोखे, शिवानंद बनसोडे, किसनराव कुऱ्हाडे, भैया शेटके, काका पाटील, संजय पटकारे, संपत चव्हाण, किशोर खानविलकर, महमद शरीफ शेख, अक्षय शेळके, दिपक थोरात, उमेश पाडळकर, संदीप सरनाईक, सुलोचना नायकवडी, वैशाली महाडीक, चंदा बेलेकर, उज्वला चौगले, पूजा आरडे, मंगल खुडे, वैशाली जाधव यांच्यासह कॉग्रेसचे सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26 ° C
26 °
26 °
89 %
5.8kmh
100 %
Sat
27 °
Sun
28 °
Mon
27 °
Tue
27 °
Wed
27 °

Most Popular

You cannot copy content of this page