Homeराजकियसरन्यायाधीश भूषण गवई यांचे इंडिया आघाडीच्यावतीने उत्साहात स्वागत

सरन्यायाधीश भूषण गवई यांचे इंडिया आघाडीच्यावतीने उत्साहात स्वागत

कोल्हापूर :
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे इंडिया आघाडीच्यावतीने कोल्हापुरात उत्साहात स्वागत करण्यात आले. ताराराणी चौक, कावळा नाका या ठिकाणी इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरला सर्किट बेंच मिळाल्याने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांचे आभार व्यक्त केले.
सर्किट बेंच उदघाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई, दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. शनिवारी सायंकाळी त्यांचे कोल्हापुरात आगमन झाले. यावेळी कावळा नाका या ठिकाणी इंडिया आघाडीच्यावतीने, त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेचे आमदार सतेज पाटील, आ. जयंत आसगावकर हे देखील प्रमुख उपस्थित होते. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या वाहनांचा ताफा कावळा नाका येथे आल्यानंतर इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करत, सर्किट बेंच कोल्हापूरला मिळाल्याचा आनंद व्यक्त करत त्यांचे आभार मानले. कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच सुरू व्हावे ही दहा दशकांची मागणी मान्य झाली. यामध्ये सर न्यायाधीश भूषण गवई यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे हा आनंद आमच्यासाठी मोठा आहे. त्याच्याप्रती आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही, त्यांचे स्वागत करत पुष्पवृष्टी केल्याचे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
यावेळी आमदार जयंत आसगावकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी.पाटील, विजय देवणे, राजेश लाटकर, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, रविकिरण इंगवले,आर. के. पोवार, राहुल माने, मधुकर रामाणे, प्रवीण पुजारी, रियाज सुभेदार, सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, श्रीराम सोसायटीचे सभापती संतोष पाटील, युवराज गवळी, आम आदमी पक्षाचे संदिप देसाई, बाबुराव कदम, विक्रम जरग, चंद्रकांत यादव, बबन रानगे यांच्यासह काँग्रेस, युवक काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, आम आदमी पार्टी यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
28 ° C
28 °
28 °
39 %
2.6kmh
0 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
27 °
Sat
27 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page