Homeशैक्षणिक - उद्योग डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठात स्वातंत्र्य दिन उत्साहात

डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठात स्वातंत्र्य दिन उत्साहात

कोल्हापूर :
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर व डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा येथे ७९वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या प्रांगणात कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र नेरली, प्राचार्य रुधिर बारदेस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण व त्यानंतर राष्ट्रगीत झाले. यावेळी डॉ. संजय डी. पाटील यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांनी नशामुक्तीची शपथ घेतली. यानंतर एनसीसी विद्यार्थांनी संचलन करत मानवंदना दिली.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे, डॉ. अजित पाटील, डॉ. उमराणी जे, डॉ. अद्वैत राठोड, डॉ. अमृतकुवर रायजादे, डॉ. आर. एस. पाटील, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, तेजशिल इंगळे, जयदीप पाटील आदींसह विविध विभागाचे प्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कसबा बावड्यातील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, प्राचार्य डॉ. महादेव नरके, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. संजय पाटील यांनी भारतमाता व महापुरुषांच्या वेशभूषेत आलेल्या छोट्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी अधिष्ठाता (स्टुडन्ट अफेअर) डॉ. आर. ए. पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, आणि ग्रुपच्या विविध शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

हॉटेल सयाजी येथे डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विश्वस्त पृथ्वीराज पाटील याची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. संजय डी. पाटील यांनी अधिकारी व कर्मचारी यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी हॉटेल सयाजीचे जनरल मॅनेजर मुकेश रक्षीत, डेप्युटी जनरल मॅनेजर गौरव गौर, प्रोजेक्ट हेड सदानंद सबनीस, यांच्यासह हॉटेल सयाजी, डीवायपी सिटी आणि डी. वाय. पाटील हॉस्पिटॅलिटीचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26.1 ° C
26.1 °
26.1 °
88 %
5kmh
100 %
Sat
27 °
Sun
28 °
Mon
27 °
Tue
27 °
Wed
27 °

Most Popular

You cannot copy content of this page