कोल्हापूर :
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरच्यावतीने मोठ्या उत्साहात तिरंगा पदयात्रा संपन्न झाली. भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. या पदयात्रेतील भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषा केलेल्या कार्यकर्त्यांचा चित्ररथ लक्षवेधी ठरला.
सायंकाळी बिनखांबी गणेश मंदिर येथील चौकात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र जमले. या सर्वांनी हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन पदयात्रेची सुरुवात केली. महाद्वार रोड परिसर पापाची तिकटी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी पदयात्रा विसर्जित करण्यात आली. भारतीय सैन्याची दिमागदार कामगिरी असणारे ऑपरेशन सिंधूरची छायाचित्राचा फलक लक्षवेधी ठरला.
याप्रसंगी नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, स्वतंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला आज भारतीय जनता पार्टीच्यावतीने भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली आहे त्याचा उद्देशच हा आहे की, आज रोजी देशाची जी फाळणी झाली त्या फाळणी दरम्यान असंख्य हिंदू नागरिकांची हत्या करण्यात आली, माता भगिनींची विटंबना करण्यात आली या सर्व गोष्टी ध्यानात राहण्यासाठी व अखंड आणि समर्थ भारत पुन्हा एकदा उभा करण्यासाठी आपण सर्व जण कटिबद्ध होऊया. तसेच सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक व ऑपरेशन सिंधूरने संपूर्ण जगाला भारत देशाने दाखवून दिले आहे की हा समर्थ व बलवान भारत आहे. जर तिकडून एक गोळी निघाली तर इकडून तोफांचा भडीमार होईल हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.
या तिरंगा पदयात्रेत भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर अध्यक्ष विजय जाधव, विराज चिखलीकर, अमर साठे, राजू मोरे, हेमंत आराध्ये, जयराज निंबाळकर, सरिता हारुगले, अमोल पालोजी, विजय अग्रवाल,सुनील पाटील, विनय खोपडे, धनश्री तोडकर, विशाल शिराळकर,अप्पा लाड, रवी गवळी, भरत काळे, सयाजी आळवेकर, दिपक काटकर, आजम जमदार, राजश्रीशेळके, किरण नकाते, गिरीश साळोख,अजित सूर्यवंशी, प्रकाश सरनाईक
आदींसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचाही विशेष सहभाग होता.
कोल्हापूरात भाजपाच्यावतीने तिरंगा पदयात्रा उत्साहात
Mumbai
overcast clouds
26
°
C
26
°
26
°
89 %
5.8kmh
100 %
Sat
27
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
27
°