Homeराजकियकेएमटी कर्मचाऱ्यांचा ७व्या वेतन आयोगाचा प्रश्न निकाली : आ. राजेश क्षीरसागर

केएमटी कर्मचाऱ्यांचा ७व्या वेतन आयोगाचा प्रश्न निकाली : आ. राजेश क्षीरसागर

कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम (केएमटी) च्या वाहतूक विभागाकडील कर्मचारी गेले अनेक वर्षे ७व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणीपासून वंचित होते. याबाबत सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात आला असून, हा प्रश्न मार्गी लागला आहे. केएमटी कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली आहे. नगरविकास मंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावावर सही करून पुढील कार्यवाहीसाठी पाठविला असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेले अनेक वर्षे केएमटी कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत होते. सन २०१९ पासून कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना ७वा वेतन आयोग फरकासह लागू झालेला आहे. परंतु, केएमटी कर्मचाऱ्यांना ७वा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रश्न प्रलंबित होता. याबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांचा पाठपुरावा यशस्वी झाला व केएमटी कर्मचाऱ्यांना ७वा वेतन आयोग लागू करण्यात आला.
या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, केएमटी कर्मचाऱ्यांच्या समस्या शासनाला जाणवून दिल्या. याकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कर्मचाऱ्यांचे भावी आयुष्य सुधरावे, त्यांना न्याय मिळावा, इतक्यावर्ष केलेल्या सेवेचे फलित व्हावे म्हणून हा निर्णय घेतला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे जीवनमान निश्चितच सुधारणार असून, घेतलेल्या निर्णयाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीचे आभार मानल असल्याचेही त्यांनी या पत्रकात म्हटले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26.1 ° C
26.1 °
26.1 °
88 %
5kmh
100 %
Sat
27 °
Sun
28 °
Mon
27 °
Tue
27 °
Wed
27 °

Most Popular

You cannot copy content of this page