Homeराजकियमहाराष्‍ट्रातील १०,००० महिला लाभार्थ्‍यांकरिता 'पिंक ई-रिक्षा' उपक्रम सुरू

महाराष्‍ट्रातील १०,००० महिला लाभार्थ्‍यांकरिता ‘पिंक ई-रिक्षा’ उपक्रम सुरू

कोल्‍हापूर :
महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू छत्रपती महाराज तसेच कायनेटिक ग्रीनच्या संस्थापिका व मुख्‍य कार्यकारी अधिकारी सुलज्‍जा फिरोदिया मोटवानी आणि सह-संस्थापक व कार्यकारी संचालक रितेश मंत्री यांच्या हस्‍ते शुक्रवारी पिंक ई-रिक्षा व रुपे कार्ड वितरण समारंभ कोल्हापूरात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात महिला लाभार्थ्यांना पिंक ई-रिक्षाचा चौथी ताफा सुपूर्द करण्यात आला.
महिलांचे सक्षमीकरण आणि शाश्वत गतीशीलतेच्‍या दिशेने पाऊल उचलत महाराष्‍ट्र सरकारने ‘पिंक ई-रिक्षा’ योजना सुरू केली आहे. महिला व बाल विकास विभागाच्‍या नेतृत्‍वांतर्गत या उपक्रमाची पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर, सोलापूर, कोल्‍हापूर, अमरावती व छत्रपती संभाजीनगर या ८ जिल्‍ह्यांमध्‍ये १०,००० पर्यावरणपूरक कायनेटिक ग्रीन इलेक्ट्रिक तीनचाकी रिक्षा तैनात करण्‍याची योजना आहे, ज्‍यामुळे महिला सक्षमीकरण आणि हरित पर्यावरणाला चालना मिळेल.
या योजनेअंतर्गत, महाराष्‍ट्र सरकार प्रत्येक ई-रिक्षाच्या किंमतीवर २० टक्‍के अनुदान देईल, तर लाभार्थी १० टक्‍के रक्‍कम डाउन पेमेंट म्हणून देतील. उर्वरित ७० टक्‍के रक्‍कम प्रमुख वित्तीय भागीदारांनी दिलेल्या बँक कर्जाद्वारे दिली जाईल, ज्यामधून सुलभ आणि कमी व्याजदरामध्‍ये आर्थिक साह्याची खात्री मिळेल. याव्यतिरिक्‍त, महाराष्‍ट्र सरकार व कायनेटिक ग्रीन लाभार्थ्यांशी संलग्‍न होण्‍यासाठी आणि बचत गटासोबत सहयोग करण्यासाठी विविध ठिकाणी प्रत्यक्ष उपक्रम राबवतील. त्यांना अधिक पाठिंबा देण्यासाठी कायनेटिक ग्रीन मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण देईल, ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यास मदत करेल आणि उत्तम चार्जिंग पायाभूत सुविधा उभारेल. कायनेटिक ग्रीन आठ सहभागी जिल्ह्यांमध्ये १५०० चार्जर तैनात करणार आहे, जेणेकरून योजनेच्या प्राप्‍तकर्त्यांना सर्वांगीण सुविधा उपलब्‍ध होतील. तसेच, वेईकल आणि बॅटरी दोन्ही पाच वर्षांच्या वॉरंटीसह येतील, सर्व नियतकालिक आणि प्रतिबंधात्मक देखभाल सेवांचा समावेश असलेला व्यापक वार्षिक देखभाल करार (एएमसी) असेल, ज्यामध्ये पाच वर्षांसाठी प्रत्येक तिमाहीत एक मोफत सेवा समाविष्‍ट असेल.
या उपक्रमाबाबत कायनेटिक ग्रीनच्‍या संस्‍थापिका व मुख्‍य कार्यकारी अधिकारी सुलज्‍जा फिरोदिया मोटवानी म्‍हणाल्‍या की, कायनेटिक ग्रीनमध्‍ये आम्‍ही शाश्वत गतीशीलता उपायांच्‍या माध्‍यमातून अर्थपूर्ण परिवर्तनाला गती देण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. पिंक ई-रिक्षा योजनेमधून हा दृष्टिकोन प्रबळपणे दिसून येतो, जेथे महिलांच्‍या सक्षमीकरणासह पर्यावरणीय स्थिरतेला प्राधान्‍य दिले जाते. महिलांना उदरनिर्वाहाच्‍या विश्वसनीय व प्रतिष्ठित स्रोतासह सुसज्‍ज करत आम्‍ही त्‍यांच्‍या आर्थिक स्थितीमध्‍ये परिवर्तन घडवून आणत आहोत, तसेच आत्‍मविश्वास व स्‍वावलंबीपणाला चालना देखील देतो. हा उपक्रम प्रबळ समुदाय आणि शुद्ध व पर्यावरणाप्रती जागरूक भविष्‍य घडवण्‍याच्‍या दिशेने पाऊल आहे, जेथे प्रत्‍येक स्त्रीला प्रगती करण्‍याची आणि शाश्वत विश्वाप्रती योगदान देण्‍याची संधी आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24 ° C
24 °
24 °
46 %
2.1kmh
0 %
Tue
29 °
Wed
28 °
Thu
29 °
Fri
28 °
Sat
26 °

Most Popular

You cannot copy content of this page