कोल्हापूर :
राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे सुरू आहेत. त्यांच्या विकासाचा आलेख सर्वस्पर्शी असून विविध क्षेत्रांमध्ये आज महाराष्ट्र राज्याने प्रगती केली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे ही आपली प्राथमिक जबाबदारी असून महापालिका व जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवणे यासाठी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांसाठी आत्तापासूनच पक्ष विस्तार आणि प्रचारासाठी कटिबद्ध रहावे, असे आवाहन गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केले.
आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीची तयारी सुरू झाली असून याचा अनुषंगाने शुक्रवारी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी कोल्हापूर जिल्हा दौरा केला.
भाजपा जिल्हा कार्यालयात शुक्रवारी भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरच्या नऊ मंडलाच्या कार्यकारिणी घोषित केल्या. यामध्ये कसबा बावडा- धीरज पाटील, शाहूपुरी- सचिन कुलकर्णी, लक्ष्मीपुरी- विशाल शिराळकर, राजारामपुरी उत्तर- रविकिरण गवळी, राजारामपुरी दक्षिण- राज गणेश पोळ, मंगळवार पेठ दक्षिण- प्रीतम यादव, शिवाजी पेठ उत्तर- कोमल देसाई, शिवाजी पेठ दक्षिण- विनय खोपडे, उत्तरेश्वर- सुनील पाटील या भाजपा मंडल अध्यक्षांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी आगामी निवडणुका संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पश्चिम जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राहुल चिकोड़े, डॉ. राजवर्धन, गायत्री राऊत, रूपाराणी निकम, गिरीष साळोखे आदींसह पदाधिकारी, नवनियुक्त मंडल पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकांसाठी कार्यरत राहावे : मंत्री पंकज भोयर
Mumbai
overcast clouds
26
°
C
26
°
26
°
89 %
5.8kmh
100 %
Sat
27
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
27
°