• नवी दिल्लीतील बैठकीत कोल्हापूर विमानतळाच्या अनेक मुद्यांबद्दल निर्णय
कोल्हापूर :
कोल्हापूर विमानतळाच्या विकासाबाबत बुधवारी नवी दिल्लीमध्ये बैठक झाली. नागरी हवाई वाहतुक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत काही महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली.
कोल्हापूर विमानतळावरील धावपट्टी पहिल्या टप्प्यात २३०० मीटर करणे, त्यानंतर धावपट्टीचा विस्तार ३ हजार मीटर करणे, कोल्हापूरहून मुंबई आणि दिल्लीसाठी नियमित आणि योग्य वेळेत विमानसेवा सुरू व्हावी, कोल्हापूर विमानतळाच्या कॅटॅगिरीमध्ये सुधारणा करावी, उच्च दर्जाची तंत्र सामुग्री कोल्हापूर विमानतळावर कार्यान्वित व्हावी, याबद्दल सविस्तर चर्चा झाली. नामदार मुरलीधर मोहोळ यांनी कोल्हापूर विमानतळाच्या गतीमान विकासाबद्दल, विमानतळ प्राधिकरणाला स्पष्ट सूचना दिल्या.
नवी दिल्लीतील बैठकीत नामदार मुरलीधर मोहोळ आणि खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी आवश्यक प्रत्येक मुद्द्यांचा आढावा घेतला. विमानतळ प्राधिकरणाचे संयुक्त महासंचालक सुरज मल, सदस्य एम. सुरेश, कार्यकारी संचालक सुजय डे, ए.एस. महेशा, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर विमानतळाचे संचालक अनिल शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
कोल्हापूर विमानतळाला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद आहे. त्यामुळे कोल्हापूरातून मुंबई आणि दिल्लीसाठी नियमित आणि सोयीस्कर वेळेत विमानसेवा सुरू व्हावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली. कोल्हापुरातून दिल्लीसाठी थेट विमानसेवा सुरू करता येईल, त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधा अधिक विकसित कराव्यात, विमानतळावर आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करावे, याकडे खासदार महाडिक यांनी लक्ष वेधले. त्याला विमानतळ प्राधिकरणाने अनुकुलता दर्शवून, लवकरच त्याबद्दलची चाचणी घेतली जाईल, असे विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी सांगितले.
सध्या कोल्हापूर विमानतळावर १९३० मीटरची धावपट्टी आहे. पहिल्या टप्प्यात ही धावपट्टी २३०० मीटर होणे गरजेचे आहे. पण त्यासाठी विमानतळ परिसरातील एका रस्त्याला पर्यायी रस्ता देवून, आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.
विमानतळाच्या वेगवान विकासाबाबत झाली सकारात्मक चर्चा : खा. महाडिक
Mumbai
overcast clouds
26
°
C
26
°
26
°
89 %
5.8kmh
100 %
Sat
27
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
27
°