कोल्हापूर :
जमिनीची सुपीकता, बियाण्यांची योग्य निवड, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन व पीक संरक्षण या पाच गोष्टींवर शेतकऱ्यांनी लक्ष देऊन काम केल्यास ऊसाचे विक्रमी उत्पादन घेणे शक्य असल्याचे प्रतिपादन कृषिभूषण डॉ. संजीव माने यांनी केले.
तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्यावतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत बागणी (ता. वाळवा) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात डॉ. माने बोलत होते. ‘विक्रमी ऊस उत्पादन’ या विषयावर त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. एन. शेलार होते.
डॉ. संजीव माने म्हणाले शेतकऱ्यांनी प्रामुख्याने जमिनीच्या सुपीकतेवर काम करणे गरजेचे आहे, त्यासाठी ऊस लागवडीपूर्वी जमिनीमध्ये शेणखत व जैविक खतांचा वापर करावा.
यावेळी कृषीतज्ञ रवींद्र बोटवे यांनी मातीतील सेंद्रिय कर्ब, मातीतील सामू घरच्या घरी सोप्या पद्धतीने चाचण्या करून मातीचे आरोग्य वाढवणे आणि तण नियंत्रण करून अधिक उत्पादन कसे घेऊ शकतो याबद्दलची अतिशय उत्तम प्रकारे माहिती त्यांनी दिली.
या शेतकरी मेळाव्यामध्ये २० विविध प्रकारचे शेतीविषयक कंपन्यांचे तसेच बचत गटांचे स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी बागणीच्या सरपंच सौ. तृप्ती हवलदार तसेच गोठखिंडी, वाळवा, शिगाव व बावची या सर्व गावांचे सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते. ४०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित लावली होती.
महाविद्यालयाचे शिक्षण प्रभारी प्रा. आर. आर. पाटील, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एम. घोलपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही. पी. गवळी व प्रा. ए. एन. केंगरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. सर्व कृषीदुत व कृषीकन्या यांनी नियोजन केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. बी. पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
——————————————————-
‘पंचसूत्री’द्वारे ऊसाचे विक्रमी उत्पादन शक्य : डॉ. माने
Mumbai
overcast clouds
26.6
°
C
26.6
°
26.6
°
86 %
4.8kmh
98 %
Fri
26
°
Sat
27
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
27
°