कोल्हापूर :
राज्य तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी जाहीर करण्यात आलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाने स्कॉलर विद्यार्थ्यांची विशेष पसंती मिळवत प्रवेश प्रक्रियेत आघाडी घेतली आहे.
कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या शाखेसाठी ९७.०३% गुण मिळवणारी सृष्टी अनिल पाटील हिने प्रवेश घेतला आहे, तर ९६.४२% गुण मिळवणारी सई किरण माने हिने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागात प्रवेश घेतला आहे. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत अनेक उच्च गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयाची निवड केली आहे.
महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता, आधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापकवर्ग, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि विद्यार्थी केंद्रित उपक्रम यांमुळे डी. वाय. पाटील महाविद्यालय हे प्रवेशासाठी प्रथम पसंतीचे ठरले आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील व विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. सातत्यपूर्ण शैक्षणिक गुणवत्तेमुळेच विद्यार्थ्यांची महाविद्यालयाला प्रथम पसंती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, १९८४ साली स्थापन झालेल्या या महाविद्यालयाला एन.बी.ए. आणि नॅककडून प्रतिष्ठित मानांकन प्राप्त झाले आहे. ही आमच्या शैक्षणिक उत्कृष्टतेची साक्ष आहे. यावर्षी आमच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. काही विद्यार्थ्यांना २७ लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. त्यामुळेच पहिल्या फेरीत महाविद्यालयाच्या सर्व शाखांना भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.
प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे म्हणाले, विद्यार्थ्यांचा व पालकांचा आमच्यावरचा विश्वास हेच आमच्या गुणवत्तेचं द्योतक आहे. येत्या काळातही प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टता टिकवून ठेवू.
यावेळी रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, प्रवेशप्रक्रिया प्रमुख प्रा. आर. जी. बेन्नी, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीला स्कॉलर विद्यार्थ्यांची पसंती
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.1
°
C
27.1
°
27.1
°
80 %
3.1kmh
100 %
Mon
28
°
Tue
28
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
28
°