Homeराजकियसर्किट बेंचच्या निर्णयाबद्दल भाजपाचा आनंदोत्सव

सर्किट बेंचच्या निर्णयाबद्दल भाजपाचा आनंदोत्सव

कोल्हापूर :
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात १८ ऑगस्टला सुरू होत असून कोल्हापूर जिल्ह्याची चाळीस वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी कोल्हापूर च्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकत्रित येत ढोल ताशाच्या गजरात ठेका धरत, साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, देवेंद्रजी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, चंद्रकांतदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा याप्रसंगी देण्यात आल्या.
याप्रसंगी प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले की, राज्यातील महायुती सरकार विकासाभिमुख असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेतलेला हा निर्णय कोल्हापूरच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, मागील ४० ते ५० वर्षापासून असणारी खंडपीठाची मागणी पूर्ण होऊन लोक लढ्याला यश आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरला दिलेला शब्द पाळला हे याप्रसंगी अधोरेखित करावे लागेल. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या रेट्याने हा प्रश्न मार्गी लागला याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.
याप्रसंगी ॲड संपतराव पवार, डॉक्टर राजवर्धन, गायत्री राऊत, हेमंत आराध्ये, अप्पा लाड, विराज चिखलीकर, शैलेश पाटील, राजू मोरे, गणेश देसाई, धनश्री तोडकर, भरत क़ाळे, संतोष भिवटे, विजय सूर्यवंशी, अतुल चव्हाण, तौफिक बागवान, दिग्विजय कालेकर, अमर साठे, राजसिंह शेळके, धीरज पाटील, विशाल शिराळकर, रविकिरण गवळी, कोमल देसाई, प्रीतम यादव, सुनील पाटील, राजगणेश पोळ, गिरीश साळोखे, अनिल कामत, संतोष माळी, माणिक पाटील चुयेकर, प्रसाद जाधव, विजय खाडे-पाटील, प्रग्नेश हमलाई, हर्षद कुंभोजकर, अशोक लोहार, सतीश अंबर्डेकर, ॲड. परवेज पठाण, ॲड. संगीता तांबे, अमित पसारे, संजय जासूद, विशाल शिराळे, नरेंद्र पाटील, दिलीप बोंद्रे, राजू जाधव, योगेश ओटवकर, अवधूत भाट्ये, रिमा पालनकर, संग्रामसिंह निकम, सुनीता सूर्यवंशी, जयश्री वायचळ, समयश्री अय्यर, छाया साळुंखे, शोभा कोळी, तेजस्विनी पार्टे, माधुरी कुलकर्णी, अश्विनी गोपूडगे, सचिन आवळे, अजित सूर्यवंशी, विजय अग्रवाल, दिपक खांडेकर, धीरज करलकर, अमित शिंदे, सचिन पोवार, सरिता हारुगले, विश्वास पोवार, किशोर लाड, संग्राम जरग, विश्वास जाधव, पुष्पक पाटील, अमेय भालकर, मनोज इंगळे, सुशांत पाटील, राहुल घाटगे, अनिल पाटील, प्रशांत अवघडे, राहुल सोनटक्के, अमर भालकर, रणजीत औंधकर, मानसिंग पाटील, संजय सावंत यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
34 ° C
34 °
29.9 °
17 %
3.6kmh
1 %
Wed
34 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
27 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page