Homeशैक्षणिक - उद्योग प्रगत ऊस रोपवाटिका प्रकल्प स्थापनेसाठी सामंजस्य करार

प्रगत ऊस रोपवाटिका प्रकल्प स्थापनेसाठी सामंजस्य करार

• डी. वाय. कृषी व तंत्र विद्यापीठ आणि डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचा पुढाकार
कोल्हापूर :
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदे आणि डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे कृषी महाविद्यालय, अहिल्यानगर या दोन संस्थांमध्ये प्रगत ऊस रोपवाटिका प्रकल्प स्थापनेसाठी सामंजस्य करार करण्यात आला. या कराराअंतर्गत उच्च दर्जांच्या ऊस रोपांची निर्मिती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रसार,  संशोधन व विद्यार्थ्यांचे कौशल्य विकास यावर भर दिला जाणार आहे.
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठातर्फे कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन, कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत, कृषी अभियांत्रिकी विभागाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. मंगल पाटील तर डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनतर्फे संचालक प्रा. सुनील कल्हापुरे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. राऊत व कृषी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. एच. एल. शिरसाठ यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
हा करार प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे ऊस रोपांची निर्मिती, संशोधन, प्रशिक्षण आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देईल असा विश्वास दोन्ही संस्थांनी यावेळी व्यक्त केला.
या करारासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
28.2 ° C
28.2 °
28.2 °
80 %
8.2kmh
17 %
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
29 °
Mon
28 °

Most Popular

You cannot copy content of this page